मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
स्‍वार्थ संताप सत्ता यांचा विलाप

प्रसंग सतरावा - स्‍वार्थ संताप सत्ता यांचा विलाप

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


समस्‍त करूनियां स्‍याहार जाला । अहंकाराचा कटिबंद विध्वंसिला । आत्‍मा निःशंक रणधीर जाला । संचितागुणें ॥१४६॥
अहं सोऽहं करित होते महाशब्‍द । आम्‍ही अहंकाराचे आखुरजाद । तर्क धोका म्‍हणे करित होतो आनंद । अहंकाराचेनि बळें ॥१४७॥
संताप अहंकाराचा मेहुणा । रडे म्‍हणे मी पडलों उणा । तुझेनि बळें त्रिभुवना । गांठ घालित होतों ॥१४८॥
संताप नानापरी गहिंवरे । म्‍हणे आम्‍ही उदंड देखिले सोयरे । परी तुझ्या तुका न येत की रे । अहंकारराया ॥१४९॥
म्‍हणे अहंकारा तुझियानि बळें । म्‍यां संतापें बहुतांसी केली सळे । परी कोणासी होऊं नेदी सोंवळें । ईश्र्वरभक्तिलागी ॥१५०॥
संताप म्‍हणे अहो भावोजी । आम्‍ही होतों तुम्‍हांस राजी । परी आम्‍हा तुम्‍हांसी दिधली बाजी । कळों नाहीं दिधलें ॥१५१॥
अहंकाराची सासू सत्ता । रणांत आली त्‍वरिता । म्‍हणे माझिया संताप सुता । आतां काय करूं ॥१५२॥
सत्ता बोलों लागली मात । संतापा तूं जरी होसी माझा सुत । तरी तूं आत्‍म्‍याचा करिसी घात । सूड घ्‍यावयालागीं ॥१५३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP