प्रसंग चवदावा - प्रसंग समाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


समाप्त प्रसंग चौदावा । तोडिल्‍या  पाखांड अविद्येचा हांवा । श्रोत्‍यावक्‍त्‍यांच्या निज दैवा । शेख महंमद वदे ॥१३०॥
श्रोते एकचित्तीं सावधान । ऐका परमार्थाचे करुनी कान । हृदयामाजी व्हावें समाधान । गोदानीरन्यायें ॥१३१॥
गोदानीर ताविल्‍या तापतें । निवविल्‍या निवांत असते । तैशी नव्हेत ही साधुमतें । अनादिसिद्ध शुचित ॥१३२॥
संत तीर्थव्रताचें अधिष्‍ठान । पुण्यपावन साधूचें चरण । म्‍हणोनि सेविती रामकृष्‍ण । अवतार धरूनियां ॥१३३॥
शेख सैय्यद महंमद महंमदीं । ग्रंथ चर्चिला निजप्रेमाचा बोधी । श्रोते पातले आशिर्वादी । जय जयकार वचनें ॥१३४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP