मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - साक्ष आल्यावरी कष्टी जहाल...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


साक्ष आल्यावरी कष्टी जहाली मनीं । मारिलें पापिणी नामयासी ॥१॥
मारिलें म्हणोनि महा शोक करी । जेवूनियां घरीं आला नामा ॥२॥
नामा आला घरा पाहे मातेकडे । आनंदानें रडे गोणाबाई ॥३॥
नामा विनवित दोन्ही कर जोडोनि । लागला चरणीं गोणाईच्या ॥४॥
नामा म्हणे माते कां शोक करिसी । सांग मजपाशीं कायजाहालें ॥५॥
माता म्हणे आतां काय सांगूं नाम्या । साक्ष माझ्या मना आली आजी ॥६॥
कवाडा आडून देखियेलें आम्हीं । जेवियेला तुम्ही तिघेजण ॥७॥
व्यर्थ मी मारिलें केला जाच तुज । ऐसा भक्तराज गांजियेला ॥८॥
आतां मज देव कोपेल विठ्ठल । ऐसी माता बोले गोंदा म्हणे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP