मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
संन्यासाचा विधि

तृतीय परिच्छेद - संन्यासाचा विधि

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां संन्यासाचा विधि सांगतो -

अथतद्विधिः बौधायनः कृत्वाश्राद्धानिसर्वाणिपित्रादिभ्योष्टकंपृथक् वापयित्वाचकेशादीन्मार्जयेन्मातृकाइमाः सर्वाणीतिस्वस्यनवश्राद्धषोडशश्राद्धादिकृत्वेत्यर्थः स्मृत्यर्थसारेपि एकोद्दिष्टविधानेनकुर्याच्छ्राद्धानिषोडश अग्निमान्पार्वणेनैवविधिनानिर्वपेत्स्वयमिति कात्यायनः कृच्छ्रांस्तुचतुरः कृत्वापावनार्थमनाश्रमी आश्रमीचेत्तप्तकृच्छ्रंतेनासौयोग्यतांव्रजेत् बौधायनः सदैवमार्षकंदिव्यंपित्र्यंमातृकमानुषे भौतिकंचात्मनश्चांतेअष्टौश्राद्धानिनिर्वपेत् ‍ अत्रक्रममाहहेमाद्रौशौनकः देवश्राद्धेब्रह्मविष्णुमहेश्वरादेवताः आर्षेदेवर्षिब्रह्मर्षिक्षत्रर्षयः देवर्षिक्षत्रर्षिमनुष्यर्षयोवा मरीच्यादिऋषयइतिसंन्यासपद्धतौतच्चिंत्यम् दिव्येवसुरुद्रादित्याः मानुषेसनकसनंदनसनातनाः भूतश्राद्धेपृथिव्यादिभूतानिचक्षुरादिकरणानिचतुर्विधोभूतग्रामश्चेतितिस्रः पित्र्येपित्रादित्रयोमातामहाश्च मातृकेमात्रादयस्तिस्रः आत्मश्राद्धेआत्मपितृपितामहादेवताः आत्मश्राद्धंपरमात्मदैवतमितिसंन्यासपद्वतौतच्चिंत्यं सर्वत्रनांदीमुखत्वंविशेषणंज्ञेयं सर्वत्रपिंडदानं युग्माविप्राः दक्षक्रतूसत्यवसूवाविश्वेदेवौअन्यन्नरंदीश्राद्धवदितिहेमाद्रिः स्मृत्यर्थसारे केशश्मश्रु लोमनखंवापयित्वोपकल्पयेत् दंडंजलपवित्रंचशिक्यंपात्रंकमंडलुं आसनंकौपीनमाच्छादनंकंथांपादुकेइति दशपंचवा एतच्चपूर्वेद्युर्नांदीमुखंकृत्वापरेद्युः पुण्याहवाचनंकृत्वाकार्यमितिशौनकः ।

बौधायन - " सर्व श्राद्धें म्हणजे आपलीं नव श्राद्धें , षोडश मासिकें इत्यादिक करुन आणि आठ पित्रादिक श्राद्धें वेगळीं करुन केशादिकांचें वपन करुन पुढें सांगावयाच्या मातृकांचें मार्जन करावें . " स्मृत्यर्थसारांतही - " एकोद्दिष्टाच्या विधीनें आपलीं षोडश ( सोळा ) श्राद्धें स्वतः करावीं . श्रौताग्निमान् असेल त्यानें पार्वणविधीनेंच स्वतः करावीं . " कात्यायन - " आश्रमरहित असेल त्यानें आपल्या शुद्धीकरितां चार कृच्छ्र प्रायश्चित्त करावें . ब्रह्मचर्यादि आश्रमयुक्त असेल त्यानें तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त करावें . तेणेंकरुन त्याला संन्यास घेण्याची योग्यता प्राप्त होते . " बौधायन - " दैव , आर्ष , दिव्य , पित्र्य , मातृक , मानुष , भौतिक आणि अंतीं आत्मश्राद्ध ( आपलें ) अशीं आठ श्राद्धें करावीं . " या आठ श्राद्धांचा क्रम सांगतो हेमाद्रींत शौनक - " देवश्राद्धांत ब्रह्मा , विष्णु , महेश्वर ह्या देवता . आर्ष ( ऋषींचे ) श्राद्धांत देवर्षि , ब्रह्मर्षि , क्षत्रर्षि हे देवता . अथवा देवर्षि , क्षत्रर्षि , मनुष्यर्षि देवता समजाव्या . मरीचि इत्यादि ऋषि देवता असें संन्यासपद्धतींत आहे , तें चित्य ( प्रमाणशून्य ) होय . दिव्यश्राद्धांत वसु , रुद्र , आदित्य देवता . मनुष्यश्राद्धांत सनक , सनंदन , सनातन देवता . भूतश्राद्धांत पृथिव्यादि भूतें , चक्षुरादि करणें , चार प्रकारचा भूतग्राम ह्या तीन देवता . पितृश्राद्धांत पिता , पितामह , प्रपितामह आणि मातामह , मातुः पितामह , मातुः प्रपितामह ह्या देवता . मातृश्राद्धांत माता , पितामही , प्रपितामही ह्या देवता . आत्मश्राद्धांत आत्मा ( आपण ), पिता , पितामह ह्या देवता . आत्मश्राद्धांत परमात्मा देवता असें संन्यासपद्धतींत आहे तें चिंत्य ( अप्रमाण ) आहे . सर्वत्रठिकाणीं नांदीमुख हें त्या देवतांना विशेषण समजावें . सर्वत्र पिंडदान आहे . दोन दोन ब्राह्मण असावेत . दक्षक्रतू अथवा सत्यवसू विश्वेदेव . इतर सर्व विधि नांदीश्राद्धाप्रमाणें समजावा , असें हेमाद्रि सांगतो . स्मृत्यर्थसारांत - " केश , श्मश्रु , लोम , नखें वपन करवून नंतर दंड , जल , पवित्र , शिकें , पात्र , कमंडलु , आसन , कौपीन , आच्छादन , कंथा , दोन खडाव हीं दहा किंवा पांच संपादन करावीं . " हें केशवपनादि पूर्वदिवशीं नांदीश्राद्ध करुन दुसर्‍या दिवशीं पुण्याहवाचन करुन नंतर करावें , असें शौनक सांगतो .

बौधायनः त्रीन्दंडानंगुलीस्थूलान् वैणवान् मूर्धसंमितान् एकादशनवद्वित्रिचतुः सप्तान्यपर्वकान् वेष्टितान्कृष्णगोवालरज्ज्वातुचतुरंगुलान् एकोवातादृशोदंडोगोवालसदृशोभवेत् अनग्निरग्निमुत्पाद्यनित्येनविधिनाततः पृष्टोदिविविधानेनेत्यर्थः स्वाग्नावेवाग्निमान्कुर्यादपवर्गोक्तमादितः आज्यंपयोदधीत्येतत्र्त्रिवृद्वाजलमेववा ॐभूरित्यादिनाप्राश्यरात्रिंचोपवसेत्ततः अथादित्यास्तसमयात्पूर्वमग्नीन्विह्रत्यसः आज्यमग्नौगार्हपत्येसंस्कृत्यैतेनचस्रुचा पूर्णयाहवनीयेतुजुहुयात्प्रणवेनतत् ब्रह्मान्वाधानमेतत्स्यादग्निहोत्रेहुतेततः संस्तीर्यगार्हपत्यस्यदर्भानुत्तरतोत्रतु पात्राण्यासाद्यदर्भेषुब्रह्मायतनएवतु जागृयाद्रात्रिमेतांतुयावद्ब्राह्मोमुहूर्तकः अग्निहोत्रंस्वकालेतुहुत्वाप्रातस्तनंततः इष्टिंवैश्वानरींकुर्यात् प्राजापत्यामथापिवा जाबालश्रुतौतद्धैकेप्राजापत्यामेवेष्टिंकुर्वंतितत् तथानकुर्यादाग्नेयीमेवकुर्यात्पश्चात्र्त्रैधातवीयामेवकुर्यादित्युक्तं तेनात्रविकल्पः अत्राहुः त्रेताग्नेः प्राजापत्या तद्वाक्यशेषेग्नीनितिबहुत्वश्रुतेः एकाग्नेस्त्वाग्नेयीति अनाहिताग्नेरिष्टिस्थानेवैश्वानरआग्नेयोवाचरुरितिमाधवः कात्यायनः आत्मन्यग्नीन्समारोप्यवेदिमध्यस्थितोहरिं ध्यात्वाह्रदित्वनुज्ञातोगुरुणाप्रैषमीरयेत् कपिलः विधिवत्प्रैषमुक्त्वाथत्रिरुपांशुत्रिरुच्चकैः अभयंसर्वभूतेभ्योमत्तः स्वाहेत्यपोभुवि निनीयदंडशिक्यादिगृहीत्वाथबहिर्व्रजेत् बौधायनः सखेमेत्यादिनादंडंयेनदेवाः पवित्रकं यदस्यपारेशिक्यंतुपात्रंव्याह्रतिभिस्तथा युवासुवासाः कौपीनंगृहीत्वाबांधवांस्त्यजेत् ।

बौधायन - " अंगुलीएवढे स्थूल पायांपासून मस्तकापर्यंत पोंचणारे असे वेळूचे तीन दंड असावेत . त्यांना अकरा , नऊ , दोन , तीन , चार , किंवा सात अशीं पेरें असावींत . ते दंड काळ्या गाईच्या केशांचे दोरीनें चार अंगुलें वेष्टिलेले असावेत . अथवा वर सांगितल्याप्रमाणें एक दंड गाईच्या केशांसारखा असावा . अनग्निकानें ‘ पृष्टोदिवि० ’ या विधीकरुन अग्नि उत्पन्न करुन त्या अग्नीवर पूर्वीपासून सर्व संन्यासाचें कृत्य करावें . अग्निमान् असेल त्यानें आपल्या अग्नीवरच सर्व कृत्य करावें . आज्य , दूध , दहीं , हीं एकत्र मिश्र करुन घेऊन किंवा उदकच घेऊन ‘ ॐ भूः सावित्रीं प्रविशामि तत्सवितुर्वरेण्यं ’ इत्यादि मंत्रांनीं प्राशन करुन त्या दिवशीं उपवास करावा . नंतर सूर्यास्ताचे पूर्वीं अग्नि प्रज्वलित करुन गार्हपत्य अग्नीवर आज्याचा संस्कार करुन त्या आज्यानें स्रुची पूर्ण भरुन प्रणवानें आहवनीय अग्नींत होम करावा . हें ब्रह्मान्वाधान होय . तदनंतर अग्निहोत्राचा होम केल्यावर गार्हपत्य अग्नीच्या उत्तरेस दर्भ पसरुन त्यांजवर पात्रांचें आसादन करुन आपण ब्रह्याच्या स्थानींच बसून ती रात्र जागरण करावें . जों ब्राह्ममुहूर्त ( पहांट ) येईल तोंपर्यंत जागें असावें . नंतर स्नानादि करुन प्रातः कालचा अग्निहोत्रहोम योग्यकालीं करुन वैश्वानरेष्टि अथवा प्राजापत्येष्टि करावी . " जाबालश्रुतींत - " किती एक प्राजापत्याच इष्टि करितात , तें तसें करुं नये , आग्नेयीच करावी . पश्चात् त्रैधातवीया करावी . " असें सांगितलें आहे . त्यावरुन या ठिकाणीं विकल्प सिद्ध झाला . या स्थळीं विद्वान् असें सांगतात कीं , ‘ तीन अग्नि ज्याला आहेत त्याला प्राजापत्या इष्टि उक्त आहे . कारण , त्याच्या वाक्यशेषांत ‘ अग्नीन् ’ असें बहुवचन श्रुत आहे . एक अग्नि ज्यानें धारण केला असेल त्याला आग्नेयी इष्टि समजावी . ’ आहिताग्निभिन्नाला इष्टीच्या स्थानीं वैश्वानर किंवा अग्निदेवताक चरु उक्त आहे , असें माधव सांगतो . कात्यायन - " आपल्या ठिकाणीं अग्नींचा समारोप करुन वेदीच्यामध्यें राहून ह्रदयांत हरीचें ध्यान करुन गुरुची अनुज्ञा घेऊन प्रैषाचा उच्चार करावा . " कपिल - " तीन वेळां नीच स्वरानें व तीन वेळां उच्च स्वरानें यथाविधि प्रैषाचा उच्चार करुन नंतर ‘ अभयं सर्वभूतेभ्यो मत्तः स्वाहा ’ असें म्हणून भूमीवर उदकांजलि देऊन दंड , शिकें इत्यादि आपली सामग्री घेऊन बाहेर जावें . " बौधायन - ‘ सख्येमे० ’ इत्यादि मंत्रानें दंड घ्यावा . ‘ येन देवाः० ’ या मंत्रानें पवित्रक घ्यावें . ‘ यदस्यपारे० ’ या मंत्रानें शिकें घ्यावें . व्याह्रतींनीं पात्र घ्यावें . ‘ युवासुवासाः० ’ या मंत्रानें कौपीन घ्यावें . याप्रमाणें घेऊन बांधवांचा त्याग करावा . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP