नवम स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । आतांऐकागंगाकथा । जेणेंहरेसर्वव्यथा । साक्षाद्देवीत्रिपथा । केवींआलीभारती ॥१॥

सूर्यवंशीनृपसगर । श्रीमान्‍ राजराजेश्वर । दोनभार्यामनोहर । शैब्याआणिवैदर्भी ॥२॥

शैब्येसीझालाकुमर । असमंजानामेंसुंदर । दुजीआराधीशंकर । पुत्रव्हावाम्हणोनिया ॥३॥

शिववरेंतीगर्भधरी । शतवर्षेस्व उदरी । मांसपिंडाप्रसवकरी । पाहूनझालीदुःखित ॥४॥

शिवाचेकरुनीध्यान । उच्चस्वरेंकरीरुदन । रुपकरुनब्राम्हण । शिवपातलातयेवेळीं ॥५॥

केलेपिंडाचेतुकडे । साठसहस्त्ररोकडे । पुत्रझालेतेवढें । शिवदेणेंविचित्र ॥६॥

सर्वतेराजकुमर । नामपावलेसागर । अश्वधुंडीतगेलेदूर । कपिलदेव आश्रमी ॥७॥

अश्वासीतेथेंपाहून । निंदिलात्याहीमहामुनी । तस्करहाचिम्हणुनी । धरुंधांवतीकालावश ॥८॥

मुनिवरेंउघडिलेनयन । क्रोधेंकेलेअवलोकन । भस्मझालेसर्वजण । साठसहस्त्रएकसरे ॥९॥

सुतमृत्यूऐकुनिसगर । शोककरीतेव्हांफार । गंगास्पर्शेतरीउद्धार । होय ऐसेसांगेविधी ॥१०॥

गंगायावीभूमिवरी । लक्षवर्षेंनिराहारी । असमंजातपकरी । मरणपावलाकालयोगें ॥११॥

त्याचासुत अंशुमान । लक्षवर्षेतपकरुन । तोहीपावलामरण । पुत्रत्याचाभगीरथ ॥१२॥

तोविष्णुभक्ततपकरी । लक्षवर्षेंनिराहारी । प्रसन्नझालाश्रीहरी । द्विभुजकृष्णतयासी ॥१३॥

मागम्हणेइच्छित । गंगाधाडीधरेप्रत । सगराचेउद्धारार्थ । भगीरथाप्रार्थीतसे ॥१४॥

वाक्यतयाचेऐकून । गंगेसीम्हणेश्रीकृष्ण । त्वांभूमीभारतींजाऊन । उद्धरावेंसगरासी ॥१५॥

वाणीशापेंभूमंडळी । जाणेंअवश्ययेकाळीं । मनुष्याचीपापेंसकळी । तवस्पर्षेनासती ॥१६॥

सागरीकरीसंगम । ममांशतोनिरुपम । गंगेऐसेतवनाम । घेतांप्राप्तममलोक ॥१७॥

तुझेंजलस्पर्शता । पापाचानाशतत्वता । तज्जलींस्नानकरितां । सायुज्यतयादेईनमी ॥१८॥

तुझेंप्रवाहीशव । पडतांचिममवैभव । त्यानराशिपुनर्भव । कदांकाळींनसेची ॥१९॥

तुझेंदर्शनवास्मरण । तवमानाचेंकीर्तन । तुझेंस्नानतुझेंपान । ममसायुज्यसर्वांसी ॥२०॥

सर्वांचेजेंपातक । तुजमाजीअवश्यक । देवीभक्तस्पर्श ऐक । नासेलसर्वश्रीगंगे ॥२१॥

पांचसहस्रवत्सर । कलीचीजातांसत्वर । विष्णुलोकींसाचार । पुनर्गमन असोतुझे ॥२२॥

भगीरथेंकेलेंपूजन । मंत्रजपतेणेंकरुन । मगकेलेंगंगास्तवन । कृष्णाज्ञेनेंतेसमई ॥२३॥

सुश्वेतकमलापरी । गौरवर्णमनोहरी । उत्पन्नजेकृष्णशरीरीं । कृष्णतुल्यागंगाही ॥२४॥

सर्वपातकाचेंदहन । हायकरितांगंगाध्यान । शुभ्रवस्त्रपरिधान । रत्नभूषणेंशोभतीं ॥२५॥

कोटिचंद्राचीप्रभा । मुखश्रीचीतैसीशोभा । नीळझळकेकेश आभा । मालतीहारगुंफिले ॥२६॥

चंदन अर्धसिंदूर । तिलकरेखिलासुंदर । पत्ररचनामनोहर । कस्तुरीनेंकेलीसे ॥२७॥

पक्वजेवीबिंबफळ । ओष्ठशोभाअतितेजाळ । जडिलींकीमुक्ताफळ । दंततैसेशोभती ॥२८॥

सुंदरशोभेस्मितवदन । संकटाक्षदिव्यनयन । श्रीफलाकारघनपीन । स्तनद्वयशोभती ॥२९॥

रंभास्तंभाचेपरी । जंघाद्वयमनोहरी । पादपद्मजियेचे ॥३०॥

रक्तपादुकीचरणीं । तेथेंहोयमुकुटघसणी । इंद्रादिजिचेचरणी । नमस्कारितिमुनिसिद्ध ॥३१॥

सर्वदेतसेभोग । सहजप्राप्त असेस्वर्ग । भक्तासिदेत अपवर्ग । दुर्लभकायदर्शनें ॥३२॥

शिवेंगाइलेंगीत । राधाझालीमोहित । द्रवलीश्रीकृष्णसहित । ब्रम्हद्रवेनमोस्तु ॥३३॥

गोलोकींरासमंडली । शिवसनिधजेझाली । गोपगोपीनीवेष्ठिली । गंगेतुजनमोस्तु ॥३४॥

कार्तिकपूर्णतिथीस । जन्मझालेजियेस । रुंदजीकोटयोजनास । लक्षगुणवहेनमोस्तु ॥३५॥

लक्षयोजनविस्तीर्ण । दीर्घमानेंचतुर्गुण । वैकुंटीजीसप्रमाण । श्रीगंगेनमोस्तु ॥३६॥

तीसलक्षयोजन । ब्रम्हलोकविस्तीर्ण । दीर्घत्याहूनपांचगुण । अलकनंदानमोस्तु ॥३७॥

शिवलोकीविस्तीर्ण । तितकीचदीर्घचतुर्गुण । ध्रुवलोकींलक्षयोजन । सप्तगुणदीर्घेनमोस्तु ॥३८॥

तितुकीचपुन्हाविस्तीर्ण । दीर्घमात्रपंचगुण । चंद्रलोकींवेष्ठन । सुधाद्रवेनमोस्तु ॥३९॥

साठसहस्रयोजन । दीर्घत्याहूनदशगुण । सूर्यलोकीअतिशोभन । तेजोमयेनमोस्तु ॥४०॥

तपोलोकींविस्तीर्ण । जाहलीलक्षयोजन । दीर्घतेथेंपंचगुण । तपोमयेनमोस्तु ॥४१॥

एकसहस्त्रयोजन । दीर्घतेथेंदशगुण । जनलोकींजीपावन । जनपावनीनमोस्तु ॥४२॥

आयामदशलक्षयोजन । लंबितझालीपंचगुण । महर्लोकीगंगास्था । महागंगेनमोस्तु ॥४३॥

कैलासीसहस्रयोजन । दीर्घतेथेंशतगुण । निर्मलोदागंगाध्यान । जटांतस्थेनमोस्तु ॥४४॥

रुंदझालीशतयोजन । दीर्घवाहेदशगुण । इंद्रलोकींगंगाआपण । मंदाकिनीनमोस्तु ॥४५॥

पाताळींदशयोजन । दीर्घवाहेदशगुण । गंगोदकभोगिसेवन । भोगावतीनमोस्तु ॥४६॥

कोसएकविस्तीर्ण । त्यांतहीकोठेंक्षीण । अलकनंदाभूभूषण । भागीरथीनमोस्तु ॥४७॥

कृतयुगींजेंवींक्षीर । त्रेतींजेवींइंदुकर । द्वापरींचंदननीर । जलरुपेंनमोस्तु ॥४८॥

स्वर्गींसदाक्षीरनीर । दर्शनस्पर्शेपरिकर । ब्रम्हहत्यादिपापेंथोर । नाशकर्त्रीनमोस्तु ॥४९॥

एवंगंगेचेस्तवन । जेकरितीनित्यपठण । करुनियागंगास्नान । अश्वमेघफलत्यासी ॥५०॥

भगीरथेंआणिली । भागीरथीनामपावली । सगराचीमुक्तीझाली । स्पर्शमात्रेंजियेच्या ॥५१॥

कार्तीकपूर्णिमेचेदिवशीं । कृष्णेपूजिलेराधेशी । वाणीकरिगायनाशी । गौरवकेलातियेचा ॥५२॥

ब्रम्ह्याचेअभिमत । शिव आळवीसंगित । सर्वझालेमुर्च्छांगत । सावधज्ञालेक्षणार्धे ॥५३॥

तोंराधाकृष्णनदिसती । जलचिभरलेंदेखती । दुःखेंतेव्हांदेवस्तविती । श्रीकृष्णातेभक्तीनें ॥५४॥

तेव्हांझालीनभोवाणी । द्रवरुपझालेदोनी । ह्याउदकाचेंदर्शनी । सर्वकार्यसाधेल ॥५५॥

मद्रूपहेंमत्संभव । माज्ञेंचहेंपूर्णवैभव । गमनरुपस्वभाव । गंगानाममत्‍ शक्ती ॥५६॥

जरीमाझेंरुपपाहिजे । शिवेंतरीप्रतिज्ञाकीजे । मंत्रशास्त्रतेणेंरचिजे । सिद्धिप्रदवेदसार ॥५७॥

वाक्यएवंऐकून । करीगंगोदकघेऊन । शपथकरीउमारमण । शास्त्ररचनाकरण्याची ॥५८॥

प्रतिज्ञात्याचीऐकून । प्रगटझालेराधाकृष्ण । गंगेचेकेलेस्थापन । सर्वलोकींश्रीकृष्णें ॥५९॥

पुरुषप्रकृतीदोघेजण । ब्रम्हरुपजेंनिर्वाण । द्रवतीचगंगाजाण । रसरुपब्रम्हें ॥६०॥

नारदासांगेनारायण । गोलोकचरित्रपावन । ज्यांतराधेचेमहिमान । चमत्कृतकथेसी ॥६१॥

द्रवरुपागंगाझाली । रतिलावण्येंरेखिली । कृष्णपाहूनमोहली । संगमनवीनवांछितसे ॥६२॥

राधानसेतेव्हांजवळी । हावभावकटाक्षबळी । मोहिलातिणेंवनमाळी । सस्मितकृष्णजाहला ॥६३॥

कृष्णाजवळीबैसला । मुखचंद्रचकोरीझाली । इतुक्यांतराधिकाआली । क्रुद्धझालीपहातां ॥६४॥

स्वर्णचंपकशोभना । अनुपम्यारक्तनयना । समरुपासखीनाना । नानोपचारेंसेविती ॥६५॥

विमानांतुन उतरली । कृष्णपार्श्वीबैसली । रत्नसिंहासनीशोभली । ब्रम्हरुपाराधिका ॥६६॥

कृष्णेंकेलेअभ्युथ्थान । नम्रवाचाकरीमान । गोपसर्वकरितीनमन । भयभीतसर्वही ॥६७॥

गंगाहीभयभीतझाली । नमनकेलेंपदकमळीं । नम्रतेनेंउभीठेली । कुशलपुसेहळूंहळूं ॥६८॥

एवंहोतांसन्मान । किंचितत्कोपझालाशमन । करुनियाहस्यवदन । श्रीकृष्णाप्रतिबोले ॥६९॥

प्राणेश्वराहीकामिनी । कोण असेसुरुपिणी । सकामातुजपाहोनि । तेहीतूंहीतैसाच ॥७०॥

मीअसतांजिवंत । एवंकरिसीदुर्वृत्त । वारंवारपरस्त्रीरत । होसीकृष्णातूंचितूं ॥७१॥

क्षमाकेलीबहुवार । नसोडिशीदुराचार । लंपटाहोऊनीकामातुर । अवमानिशीमजलागी ॥७२॥

सवेंघेऊनतियेशी । आतांचिजाईदूरदेशी । संगतीनकोमजसी । अन्यबुद्धीतूझीसदा ॥७३॥

एकदांचंदनकाननी । विरजेसहदेखिलानयनी । उगीराहिलेंसखिवाक्यानी । गुप्तझालासीमत्शद्वे ॥७४॥

विरजादेहत्यागुनी । सवेंचझालीवाहिनी । रुंदझालीकोटियोजनी । चतुर्गुणदीर्घती ॥७५॥

अद्यापीतीनदिरुपिणी । आहेतुझीकीर्तिकरणी । मीजातांचिगृहांगणी । पुनःगेलासतेथेंतूं ॥७६॥

विरजेचेंकरुनस्मरण । त्वांकेलेंमोठेंरुदन । प्रगटलीतीतोयामधुन । योगसिद्धासुरुपा ॥७७॥

तिणेंदिलेंतुजदर्शन । झालातिशीरममाण । तिणेंकेलेगर्भधारण । सप्तसमुद्रप्रसवली ॥७८॥

पून्हाएकदांशोभेप्रती । भाळलासीतूंगोपती । चंपकवनीतुजप्रती । पाहिलाकृष्णातेधवा ॥७९॥

तेव्हांहीशब्द ऐकून । झालासिप्रियाअंतर्धान । शोभाहीदेहटाकुन । चंद्रमंडळीराहिली ॥८०॥

तिचेंतेजोमयशरीर । पाहूनकष्टसीफार । टाईंठाईंतेजसुंदर । वाटेकेलेसदेहाचे ॥८१॥

रत्नमणिसुवर्ण । नृपफलस्रीवदन । पल्लवधान्यस्रुमन । देवगृहींनृपगृहीं ॥८२॥

दलदुग्धांदिकींवाटिसी । शोभांदेहतेजाशी । आणिकएकदांतुजसी । वृंदावनीपाहिलें ॥८३॥

प्रभागोपीसवेरमसी । मत्शब्देंचिगुप्तहोशी । गेलीतीसूर्यमंडळाशी । देहटाकूनगोपिका ॥८४॥

तीव्रतेजतिंचेंशरीर । विभागकरीशीसत्वर । मदभयेंलाजूनीफार । रुदनकरीसीकामुका ॥८५॥

नेत्र अग्निदेवयक्ष । नागविप्रवीरपुरुष । मुनीतपासुभगास । यशस्व्यासवाटले ॥८६॥

वसंतीपुष्पशय्येवरी । रासमंडळाचेंअंतरी । मंचकीरत्नमंदिरीं । रत्नदीपपाजळले ॥८७॥

लाऊन अंगीचंदन । रत्नाभरणेंमाल्येकरुन । स्वदेहातेशोभऊन । रत्नभूषेसहरमसीतूं ॥८८॥

शांतिगोपीवरीभाळसी । विडातिचांस्वीकारिसी । ऐकतांचमाझेशब्दासी । गुप्तझालासिसवेगा ॥८९॥

शांतीदेहातेटाकून । तुजमध्येंझालीलीन । देहतीचाविभागून । टाकिलाशीरासेशा ॥९०॥

जनींवनींसंतीब्राम्हणीं । मीलक्ष्मीआणिवाणी । उपासकींमत्सेवनीं । विभागलेसर्वतः ॥९१॥

ऐसाचक्षमागोपिसी । घेउनियानिजलाशी । हरिलेंम्यापींतांबराशी । मुरलीहारकुंडलें ॥९२॥

तेव्हांमीजागविलें । स्मरण आहेवाविसरले । लज्जेनेंकृष्णवर्णझालें । पापयोगेंशरीर ॥९३॥

क्षमादेहटाकून । क्षमेमाजीझालीलीन । देहाचेविभागकरुन । वाटिशीतेव्हांदुःखानें ॥९४॥

विष्णुवैष्ष्णवधार्मिक । दुर्बलपंडितभाविक । एवंतूंगुणनायक । आणिकायवदूंआता ॥९५॥

एवंबोलूनिकृष्णाशी । बोलावेंजोगंगेशी । भावजाणुनमानसी । गुप्तझालीश्रीगंगा ॥९६॥

राधापाहेयोगबळीं । गंगादिसेव्याप्तजळी । राधाभरुनयाचुळी । शोषूंपाहेगंगेते ॥९७॥

गंगेनेंतेंजाणून । प्रवेशलीकृष्णचरण । ब्रम्हादिलोकधुंडून । पाहिलेंतेव्हांराधेनें ॥९८॥

कोठेंनसेंगंगाजल । शुष्कझालेंविश्वसकळ । विधिहरिहरादिसकळ । शुष्ककंठजाहले ॥९९॥

गोलोकांमाजीआले । परब्रम्ह अवलोकिलें । कृष्णमयसर्वझाले । स्तविलेंमगविधीनें ॥१००॥

कृष्णाज्ञेनेंराधेशी । तोष उनीमानसीं । गंगानेलीवैकुंठासी । कृष्णचरणीतीप्रगटे ॥१०१॥

ब्रम्हाठेवीकमंडलूंत । हरेंरक्षिलीजटेंत । विवाहकरीरमाकांत । विधिवचनेंगंगेशी ॥१०२॥

एवंगंगोपाख्यान । नारदासांगेनारायण । व्याससांगेनृपालागुन । सूतसांगेशौनका ॥१०३॥

श्लोकतीनशततेरा । गंगोपाख्यानविस्तारा । वदलीयेथेंकृपापारा । जगदंबास्वभाषेनें ॥१०४॥

श्रीदेवीविजयेनवमेचतुर्थोध्यायः ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP