षष्ठः स्कंध - अध्याय पांचवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । जनमेजयम्हणेमुनी । विप्रवधिलेंहैहयानी । कायनाशिलेद्विजानी । म्हणोनिएवढेपापकेलें ॥१॥

हैहयहेकोणकुळी । जन्मलेकोणतेवेळीं । कथायांचीसमुळी । सविस्तरेंवर्णिजे ॥२॥

व्यासम्हणेऐकनृपती । सहस्रार्जुनमहामती । कार्तवीर्यतयाम्हणती । भुजसहस्रतयाशी ॥३॥

केवळतोविष्णुअवतार । हयहयवंशमहाथोर । दत्तात्रयगुरुनिर्धार । सेविलाजेणेंसदभावें ॥४॥

दातायज्वाशूरमानी । धीरगंभीरशुद्धाचरणी । पुरोहितभार्गवामानी । बहुदानकरीतसे ॥५॥

भ्रुगुवंशीचेब्राह्मण । दानमानेंझालेंसधन । पुढेंनृपकालेंकरुन । स्वर्गवासीजाहला ॥६॥

तयावंशाचेक्षात्रजन । बहुकाळेंझालेनिर्धन । कार्यवशेंबहुकष्टून । द्रव्यमागतीब्राम्हणा ॥७॥

म्हणतीविप्राद्रव्यदीजे । पुढेंसपादघेईजे । येवेळींकाजकीजे । गुरुतुह्मींब्राह्मण ॥८॥

तेलोभाविष्ठब्राम्हण । नाहींचम्हणतीकिंचिद्धन । अनृतएवंबोलून । गुप्तकरितीवित्तते ॥९॥

पृथ्वीमाजीपुरिती । शूद्रापासीठेविती । घरेंसोडूनपळती । लोभयोगेविप्रते ॥१०॥

क्षत्रिययेतीत्यांचेघरी । कुलुपेंपाहिलीदारोदारीं । द्विजगेलेंवनांतरीं । आक्रोशतीभयानें ॥११॥

एकगृहतेंउघडिलें । आंतखोदुनीपाहिलें । जागींजागींसांपडलें । धन अपारक्षत्रियां ॥१२॥

एवंपांहतांदुसरें । धनमिळेंअपारें । कपटपाहूनिशिरे । क्रोघतयांच्याअंतरी ॥१३॥

विप्रयेतीकाकुळती । द्रव्यनघ्यावें म्हणती । क्रोधेतेव्हांबाणमारिती । ब्राम्हणासीक्षत्रिय ॥१४॥

मागेंकरुनीपापासी । आरंभितीहत्येशी । भार्गवकुळींविप्राशी । देखतांचिवधितीते ॥१५॥

विप्रपळतीसैरा । कोठेंनमिळेथारा । क्षत्रीधुंडीतिगिरिकदरा । निर्बीजकरुंपाहती ॥१६॥

नारीपाहतांगर्भिण । सवेचिमारितीबाण । गर्भाचेहीकृंतन । करितीतेदुरात्मे ॥१७॥

विप्रस्त्रियाआक्रंदती । दर्‍याखोर्‍यामाजीलपती । तेथेंहीदुष्टप्रवेशती । घातकरितीगर्भाचा ॥१८॥

एवंपाहोनिघात । अन्य ऋषींतयांबोधित । बरवानव्हेब्रम्हघात । गर्भपातकरुंनका ॥१९॥

महापातकाचेंफळ । होईलतुम्हांशीघ्रकाळ । ऐकूनीबोलतीखळ । हेतुयुक्ततयाशी ॥२०॥

तुम्हींसाधूसज्जन । नेणतांयांचेंलक्षण । गृहींद्रव्यपुरुन । नाहींम्हणतीआम्हांसी ॥२१॥

आमचेजेपूर्वज । द्रव्यदेतीबहुचोज । किमर्थरक्षितींद्विज । दानयज्ञनकरिती ॥२२॥

भोगयज्ञदान । कीजेजरीअसेंधन । वृथाठेवितींसांठवून । अग्निचोरराजभीति ॥२३॥

अथवाठग उनीनेलें । तरीतेंव्यर्थचीगेलें । रक्षकासीत्यांगिले । धनेंसर्वत्रसर्वदा ॥२४॥

अनेक उपायेकरुन । निघूनजातेचंचलधन । अथवास्वयेंचिगेलामरुन । धनतेथेंचीराहिलें ॥२५॥

नाशभोगकिंवादान । धनाचेपरिणामतीन । कृतिमंतसाधीदोन । नाशहोयनातरी ॥२६॥

दाताभोक्ताजोनसे । उगाचधनाजपतसे । तोराज्यासदंडय असे । मारितोंआम्हींयाकरितां ॥२७॥

आपणक्रोधनकीजे । एवंबोलूनितेराजे । विप्रघातींतेधनकाजे । महापापसांठविती ॥२८॥

सर्वपातकांचेंमूळ । लोभशत्रूमहाखळ । गुरुपितागोत्रकुळ । टाकोनीप्राणघेतीदेती ॥२९॥

पांडवीलोभेंकरुन । केलेंकुंटुबहनन । लोभयुक्तहोतांमन । कायएकनकरीतो ॥३०॥

असोएवंतेहैहय । लोभेंझालेनिर्दय । विप्रस्त्रियाअतिसभय । हिमालयासीपातल्या ॥३१॥

देवीमूर्तीमृन्मय । पुजूनीकेलानिश्चय । उपोषणेंपंचम । त्यागूंबैसल्यातेधवां ॥३२॥

अंबास्वप्नींयेउनी । वरदेतमधुरवचनी । तुम्हांतकोणीकामिणी । गर्भधरीलऊरंत ॥३३॥

तोपुत्रसलक्षण । कुलाचेकरीलरक्षण । गुप्तझालीतेक्षण । आश्वासूनिस्त्रियाशीं ॥३४॥

आशिर्वादेंयेकनारी । उरुमाजीगर्भधरी । क्षत्रियधावतीएकसरी । मारावयातियेते ॥३५॥

भयाभीतपळूंलागली । उच्चस्वरेंआक्रंदली । गर्भासीतेव्हांदयाआली । जंघेंतूनिप्रगटला ॥३६॥

अतितेजस्वीसोज्वल । प्रत्यक्ष अग्नीचकेवळ । पाहतांचीक्षत्रियखळ । अंधजाहलेसर्वही ॥३७॥

सैरावैराधांवती । पाषाण वरी अपटती । गात्रभंगेंचरफडती । प्रार्थितीस्त्रियेसीतेवेळां ॥३८॥

अपराधीआम्हींथोर । मातेरक्षीदयापर । मरणाहुनीदुःखथोर । अंधत्वाचेंसोडवी ॥३९॥

आतांनकरुंऐसें । शपथाकरितीबहुवसे । विव्हलपाहूनतैसें । और्वमाताबोलिली ॥४०॥

दृष्टिममपुत्रेहरिली । तुम्हींकुलहानीकेली । अंबिकेनेंकृपाकेली । वरदपुत्रजाहला ॥४१॥

ऊरुमाजीप्रगटला । शतवर्षेंधारणकेला । वेदादिसांगपढला । गर्भांतरींसर्वही ॥४२॥

तयाशींचहोताशरण । करीलतुमचेंरक्षण । ऐकूनिऐसेंवचन । और्वासीतेप्रार्थिती ॥४३॥

दयायुक्त और्वमुनि । दृष्टीदिलीपरतोनी । क्षत्रियसर्वनमूनी । परावृत्तजाहले ॥४४॥

सवेघेऊनियाबाळ । स्त्रियासर्व उतावेळ । स्वस्वगृहींतात्काळ । पातल्यास्वस्थजाहल्या ॥४५॥

विप्रजेकोणीवाचले । ऐकूनतेहीपरत आले । स्वस्वगृहींराहिले । रक्षिलेंऔर्वेस्वकुल ॥४६॥

व्यासम्हणेनृपती । ऐकतयांचीउत्पत्ती सूतेंतेचऋषीप्रती । गाईलींऐकाश्रोतेहो ॥४७॥

सूर्यपुत्ररेवंत । एकदांविष्णुदर्शनाप्रत । वैकुंठासीसहजयेत । अश्वारुढदेखणा ॥४८॥

उच्चैः श्रवातोहरी । जोप्रगटलासागरी । रत्नरुपबैसलावरी । सूर्यपुत्रसूर्यसा ॥४९॥

पाहूनियातयादुरी रमेसीपुसेश्रीहरी । कोणयेतसूर्यापरी । मोहवीतत्रिभुवना ॥५०॥

पुनःपुनःहरीपुसे । परीरमेचेंलक्षनसे । डोळांवाजीरेखिलासे । अतिसुंदरबंधूतो ॥५१॥

हरीमध्येंपाहूनमन । हरीझालाकोपायमान । मजदेखतांतुरगीमन । जडलेतुझेचंचले ॥५२॥

सर्वत्रतूंरमसी । तेणेंचरमाम्हणविशी । तूंअतिचंचलमानसी । जेवींनारीप्राकृत ॥५३॥

मनजडलेंवाडवी । ममशापेंहोवाडवी । मृत्युलोकीदैवभावी । विचरेरमेयथेच्छ ॥५४॥

ऐकतांचिशापवाणी । रडूलागलीरमणी । म्हणेदेवाचक्रपाणी । सत्वमूर्तेदयाळा ॥५५॥

स्वल्प असतांअपराध । केवढादेवाहाक्रोध । तुजवांचोनीदेहबंध । केवींआतांक्रमूमी ॥५६॥

उश्शापदेईमजसी । पुनःतूंकधीभेटसी । केव्हांमीस्वरुपासी । पावेनसांगकेशवा ॥५७॥

मगवदेनारायण । मजसमहोईलनंदन । तैपुन्हावैकुंठसदन । पावसीलनिश्चयें ॥५८॥

व्यासम्हणेजन्मेजया । शापयोगेंकमलालया । सुंदरघोडीहोवोनिया । मृत्युलोकींपातली ॥५९॥

पाहूनितेंसर्ववृत्त । भयेंतेथुनिरेवंत । नमूनिगेलापरत । कथिलेंसर्वपितयाशी ॥६०॥

छायानामेंमित्रजाया । तपलीपूर्वीज्याठाया । रमातेथेंयेवोनिया । काळक्रमीतपोयोगें ॥६१॥

कालिंदिरम्यपुलिनी । रमारुपेंअश्विनी । आराधिलाशिवमनी । शूलीकपालीत्रिनेत्र ॥६२॥

व्याघ्रचर्मकेलेंवसन । गजकृतीआच्छादन । माथाचंद्रशोभन । सर्पभूषानीलकंठ ॥६३॥

पिंगटजटामंडळ । गंगावाहेझुळझूळ । गळांरुळेंमुंडमाळ । भस्मोध्दुलितसर्वांग ॥६४॥

महावृषभ अतिगौर । वरीविराजेकर्पुरगौर । गौरीवामांकीसुंदर । सहस्त्रवर्षेंघ्याइला ॥६५॥

एकाग्रकरुनीमन । उभीराहेनेत्रझांकून । ह्रदयधरिलेंध्यान । अश्वरुपीरमेने ॥६६॥

प्रसंनजाहलाशिवभोला । उमेसहिततेथेंआला । रमेसीमगबोलिला । विचित्रबोलवेदोक्त ॥६७॥

जगन्मातेरमे । कांतपसीसुमध्यमें । स्त्रियांसादेवानिगमे । पतीएकगाइला ॥६८॥

उत्तममध्यमाधम । पतीतोचिदेवपरम । तवपतीतोसर्वोत्तम । सोडुनीमजध्यासीकां ॥६९॥

लक्ष्मीम्हणेशंकरा । शापयोगेंजगदोद्धारा । पतिदशन कामपूरा । करवीमजसांप्रत ॥७०॥

जोहरीतोचिहर । नसेकिमपीअंतर । पतिमुखेंजाणलेंपर । म्हणोनीस्मरलेंदेवदेवा ॥७१॥

व्यासम्हणेनृपती । शिवम्हणेरमेप्रती । होईलहरिसंगती । हरिरुपेंहरिप्रियें ॥७२॥

तयापासावहोईलस्रुत । एकवीरनामेंविख्यात । एकचक्रीनृपनाथ । हैहयकुळम्हणवेलहे ॥७३॥

स्वरुपेंपतीपावशी । सुखेंस्वधामाजासी । प्रेरीनतैसाचहरीशी । जेवींयेईलहरीरुपें ॥७४॥

परीएकचुकलीस । स्मरणतीचेविसरलींस । ह्रदयस्थापरांबेस । तेणेंजाहलीदुर्दशा ॥७५॥

ह्रदईंतूंस्मरतीसजरी । मननजातेंअश्वावरी । आतांघ्यानदृढधरी । दुःखसर्वहरील ॥७६॥

एवंरमेशीबोधून । शिवझालाअंतर्धान । रमाअतिसंतोषोन । ह्रदईंघ्याईंपरांबा ॥७७॥

श्लोकएकशेंब्यायशी । त्याचेसारप्राकृताशीं । वदलीस्वयेंपरेशी । लोकहितार्थकृपेनें ॥७८॥

श्रीदेवीविजयेषष्ठेपंचमः ॥५॥ 

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP