मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत लोकगीते| गौरीबाळा कुलदैवत लोकगीते शंकर-पार्वती गिरजा शिव-गौरी हरहर महादेव शिवा शिवा महादेवा आम्हा संबाचं ध्यान शंकराचं लगीन शिव पार्वती प्रश्नोत्तरे भिल्लीण महादेव आरती आरती नमन घाणा गणेशस्थापना गौरीबाळा हरिजागर गण कुलदैवत - गौरीबाळा मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत गौरीबाळा Translation - भाषांतर १यावे नाचत गौरीबाळाहाती घेऊनी पुष्पांच्या माळासर्वे ठायी मी वंदितो तुलायावे नाचत गौरीबाळाचौदा विद्येचा तू माता पितासर्वे ठायी हाये तुजी सत्ताचार वेदा घ्यावे वेळोवेळायावे नाचत गौरीबाळासाही शास्त्रे अठरा पुराणतुझ्यापासून झाले निर्माणभक्त देवी येती मंडपालायावे नाचत गौरीबाळामुळारंभी सत्व धरी पायासंगे घेत सरस्वती मायाकिती विनवी तुला भक्तमेळायावे नाचत गौरीबाळा२मोरया गणपती रे गणराजाकिती विनवू तुला म्हाराजातेहतीस कोटी देव दैवतासर्वा आधी गणनायकादैत्य मारुनी केलीस दशालावली पळवून धाही दिशाचेडा झुटिंग वेताळ म्हैशादुष्टाला देशी तू सजाकिती विनवू तुला म्हाराजातुझा धाक तिन्ही ताळालादिला सराप तू चंद्रालाचतुर्भुज तू मंगलमूर्तिसंगे घेऊनी सारजा सतीहाती त्रिशूळ डमरु बाजाकिती विनवू तुला म्हाराजाअष्टभैरव सिद्ध सोळाचौसष्ट जोगणींचा मेळागण शंभर कोटी जमलेमाझ्या अंगणी येऊनी गमलेपीर पैगंबर हे रमलेगाऊ नाम लावू ध्वजाकिती विनवू तुला म्हाराजा N/A References :संग्राहिका: डॉ. सरोजिनी बाबर Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP