|
पु. ( पावसाच्या मोठ्या सरीचा होणारा ) सड्सड् असा आवाज . [ ध्व . ] उ.क्रि. १ गारा , पावसाचे मोठे थेंब , खडे वगैरेनी मारणें . २ दोरी , छडी वगैरेनी ताडण करणें . ३ लाथ , दुगाणी वगैरे झाडणें . ४ लांकूड , दगड वगैरे साफ न करता सुमाराचा आकार येईल असें कुर्हाड किंवा सुतकी वगैरेनी सरासरी तासणें . ५ धुवावयाचे वस्त्र दगडावर जोरजोरानें आपटणें . ६ मळ , कीट निघून जावें म्हणून धातूचा तुकडा ऐरणीवर घणानें जोरानें ठोकणें . ७ सरासरी बारीक अंश वेगळा होई असें मोठयानें पाखडणें , उभळणें . सामान्यतः कोणतेहि गोष्ट सरासरी घाईघाईनें जोरजोरानें , निष्काळजीपणानें करणें . [ ध्व ? ]
|