-
पु. एक हिंदु जात व तींतील व्यक्ति . फाशी देण्याचें काम यांचेकडे असे ; यांच्यांतील कांहीं सांकेतिक शब्द - हिडका = मारामारी . कुडतुल = पेटी . धादल , खडल = फोडणें . कुडपळ = गाडी . गांगल = चांभार . पेडणें = पळून जाणें . खुमर = दार . तवला = खुनासहित दरोडा . शेग = मालाचा वाटा . पेडम , भुरा = युरोपियन . हलक , हलवा = सोनें किंवा चोरीचा माल . दुबक , फुकणी = बंदूक . कूड , कुडच = घर . नादी , खवडी = घरफोडी . बे , बोय = दिवा . चिलड = कुलूप . खारपे , दमुल = पैसा . ऊन = चांदणें . झुकीर , मुलसी = पोलीस . ताड = दोरी . हुरकत , पेडा , हुराकडा = पळ . तोलकला = निजला . निलगंटी = काठी . कडूल , कटनूल = तलवार ; हत्यार . मूच , नली = चोरी . इ० - गुजा . [ सं . मातंग ] अंगांत मांग शिरणें , मांग शिरणें , येणें - रागावणें ; त्वेष चडणें .
-
०गारुडी गारोडी - पु . मांगांतील एक पोटजात . हे म्हशी विकतात व भादरतात . यांच्या टोळ्या गांवाबाहेर पालांत उतरतात ; ढोल बाजवून नजरबंदीचा खेळ करतात . धान्य , मेंड्या इ० चोरतात .
-
०गारुड न. मांगगारुड्याची जादुगारी ; मूठ फेकणें . मांगटा , डा पु .
-
मांग हा अतिशय तापट, कडक असतो
Site Search
Input language: