-
स्त्री. एक काटेरी फळझाड . हे करवंदाच्या झाडासारखे असून डोंगराळ प्रदेशांत होते . यास फुलांचे तुरे व पिवळट रंगांची फळे येतात . - न . वरील झाडाचे फळ , हे खाण्यास चांगले लागते ; हे तुरट , आंबट , उष्ण व गुरु असून रक्तपित्तनाशक , कफ व वात यांचा नाश करणारे व सारक आहे . गांगेरुक म्हणून तोरणाची दुसरी एक जात आहे . - वगु ४ . १५ .
-
न. १ ( घराच्या ) पुढील दरवाजाच्या चौकटीची वरची आडवी पट्टी ; गणेशपट्टी . २ समारंभ , उत्सव इ० आनंदप्रसंगी घर , मांडव इ० कांच्या प्रवेशद्वारजवळ आंब्याची पाने , डाहाळ्या , फुले इ० दोरीत ओवून बांधतात ते मंगलचिन्ह . वोस गृही तोरण बांधिले । कां उपवासी अन्ने लिंपिले । - ज्ञा १३ . ४६९ . ३ होळीवर , देवादिकांवर बांधतात ती नारळ , खोबर्याच्या वाट्या इ० कांची माळ . ४ तराजूचा कांटा ज्यांत इकडून तिकडे हलतो ते दुबेळके . [ सं . ] सामाशब्द -
-
०टका पु. लग्नमंडपावरील कर . [ तोरण + टक्का ]
-
०भेट स्त्री. लग्नावरचा कर , पट्टी . - शर . [ तोरण + भेट = नजराणा ]
Site Search
Input language: