|
अ.क्रि. उकळून वर येणें ( दूध , कढी वगैरे ). जैसें उतलें आगीं पडे । तें नलगेचि होमा । - ज्ञा १८ . १९३ . पू वगैरे येणें ( डोळ्यांतून ). ओठादि अंगावर पुटकळ्या , फोड येणें ( तापामुळें , वस्तरा लागून ). बिब्बा वगैरे लागल्यामुळें चिडणें ; फुगून वर येणें . कोणे सवतीनें भरला भिलावा उतला । - निर्गुणाचा पाळणा . १२ . खतखतणें ; खदखद होणें ( आगीवांचून शिजल्याप्रमाणें ). ( कांहीं चूर्णावर लिंबाचा रस घातला असतां होतें तसें ). फेंस येणें . भरुन वाहणें . कोपावेशें झालें कल्पांतीचें समुद्रसें उततें ॥ - मोमीष्म ९ . २६ . ( ल . ) गर्वानें फुगून जाणें . किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें । - ज्ञा १६ . २२९ . खळा ! न मदें उतरे । - मोरा २६ . उसळणें ; उचंबळून वर येणें . तातला तेलीं सागर । उतताती । कल्पांतींचे जसे जलधि उतते । - मोवन १० . ३९ . माजणें ; फुगणें ; जोरानें वाढणें - ( पीक , गवत , भाजी वगैरे ). अतिशय समृध्द होणें ; कल्पनेबाहेर बहर येणें ( धान्य , फळें वगैरेस ). [ सं . उत + तन ; म . ऊत ; तुल० का . उदु = फुगणें ] उतूं , जाणें , चालणें - खर्च होणें ; नुकसान होणें ; तोटा होणें ; अडणें . माझें काय त्यांवांचून उतूं जात आहे . उतूं येणें - ऊत येणें ; उतास येणें ; वर येणें ( दूध इ० ); फेंस येणें ; ( ल . ) रहस्य असणें ; आटोकाट , अतिशय प्रेम असणें .
|