-
क्रि.वि. १ कोणत्या प्रकारनें अथवा रीतीनें ? कशासाठीं ? कोणत्या कारणानें ? हा शब्द अपुर्वता किंवा लोकोत्तरपणा दाखविण्यासाठी निरनिराळ्या क्रियापदाबरोबर पुष्कळ वेळां योजितात . जसें :- हा धावतो कसा , जेवतो कसा , लिहितो कसा , बोलतो कसा इ० त्याचें वर्णन मला करवत नाहीं !; ओहो ! धांव कसा , बोल कसा , जेव कसा = ज्याला दुसरें उदाहरण नाहीं असें धाव , जेव , वगैरे , म्हणजे मारुती सारखा धाव ; बृहस्पतीसारखा बोल , गनपतीसारखा लिहि , कर्णासारखा किंवा बळीसारखा दानधर्म कर इ० २ सामान्य अर्थानेंहि योजितात जसें :- जा कसा ; ये कसा ; बोल कसा = कोणत्या तरी प्रकारानें कसेंहि करुन जा , ये बोल इ० . ३ निश्चितार्थानें किंवा निःसंदेहार्थानें जसें - तूं जा कसा - निश्चित जा . ' भीष्म पतन पावे तों आम्हांला हो सहाय चाल कसा । ' मोभीष्म १ . १०२ .
-
पु. ( आगरी ) लहान बोरू . याची लेखणी करतात . ' ह्मा ओहोळाच्या खाचरांत चालू सालीं कसा फार आहे .' ( सं . कशेरु )
-
वि. कोणत्या जातीचा , प्रकारचा , धतींचा , रीतीचा देखाव्याचा , म्ह० ' कशांत काय फाटक्यांत पाय ' ( सं . कीदृश )
-
a Of what kind?
Site Search
Input language: