-
उ.क्रि. १ शस्त्राने , कापण्याच्या साधनाने , अंगबलाने ( एखाद्या वस्तूवर ) घाव घातल्यासारखे करुन , ओढल्यासारखे करुन , धसकावून , खांडून , खापलून , चिरुन , तासून ( तिचे ) तुकडे करणे ; छाटणे ; जोराने विभक्त , वेगळा करणे ; कापणे ( या अर्थी तोडणे व मोडणे या दोन धातूंतील फरक लक्ष्यांत घेण्यासारखा आहे . ज्यावेळी शस्त्राच्या आघाताने किंवा आकस्मित शरीरशक्तीने व जोराने एखाद्या वस्तूचे तुकडे करितात त्यावेळी तोडणे हा धातू योजतात . मोडणे या धातूच्या अर्थात ( पदार्थाच्या ) मूळच्या रुपांत , आकारांत जोराने अथवा कशाहि रीतीने छिन्नविच्छिन्न घडवून आणणे असा ध्वनि असतो . मोडणे पहा ). का शस्त्रवरी तोडलिया । - ज्ञा ६ . ३७० . २ ( मूल ) अंगावर पाजण्याचे बंद करणे . मूल तोडले . स्तन मागे घेणे ; काढून घेणे . थान तोडले . ३ ( एखादी वस्तु देण्याचे ) बंद करणे ; ( एखादी वस्तु देण्याचे परिमाण ) कमी करणे . क्षुधा तृषा कोंडी । आहाराते तोडी । मारुनियां । - ज्ञा ६ . ३४६ . त्याचे अन्नच तोडले पाहिजे . - कोरकि ४१७ . ४ ( फौज , खर्च , कारखाना , पगार इ० ) कापणे ; छाटणे ; कमी करणे . ५ मोडणे ; बरखास्त करणे ; बंद करणे . ( भागीदारीचा धंदा , व्यवहार , मैत्री अथवा इतर संबंध , एके ठिकाणी जमलेली - संयुक्त असलेली मंडळी , समिति ). ६ ( कलह , भेद , गडबड , दंगा इ० ) मिटविणे ; शांत करणे ; समाप्त करणे ; संपविणे . ७ लचका तोडणे ; कुरतडणे व फाडणे ; दातांनी , नखांनी धरुन ओढणे . ८ सतावून , पिसाळून सोडणे ; ( तगादेदार , भिकारी , काम करुन घेणारे इ० कांनी ) खनपटीस बसून , तगादा लावून छळणे ; सतावून टाकणे . [ सं . त्रोटन , तुड ( तोडति ); प्रा . तोड ; गु . तोडवुं ; हिं . तोडना ; सिं . तोडणु ] ( वाप्र . ) तोडिजणे - अक्रि . तोडतां येणे ; तोडणे . मग मनोरथवेलीची फळे । हाते तोडिजेती । - शिशु ७२ . [ तोडणे ] तोडून घेणे - सक्रि . खंडाने , मक्त्याने , इजारा करुन ( शेत इ० ) स्वतंत्रपणे वहिवाटीस देणे . सामाशब्द - तोडमोड - स्त्री . १ ( कर्जफेड , अडचण इ० कारणांमुळे सोन्याचांदीचे दागिने , भांडीकुंडी इ० सामान ) मोडून , विकून पैसे करणे . २ दोन विरुद्ध पक्षांतील मतभेदाच्या , आक्षेपाच्या बाबी कमी करुन त्यांत तडजोड , सलोखा घडवून आणण्याची क्रिया ; तडजोड ; तोडजोड ; तोड . ३ धान्याच्या रुपाने शेतसारा ठरविण्याची क्रिया . ४ ( सामा . ) ( एखाद्या कामांतील ) खाब्याखुब्या ; मख्ख्या ; मर्मस्थाने ; ( एखाद्या धंद्यातील ) आडमार्ग ; मुरड ; आडाखे ; ( एखाद्या यंत्रातील ) गुंतागुंत ; हातोटी ; गुरुकिल्ली ; मख्खी . ५ मोडकीतोडकी भांडीकुंडी , दागदागिने , हत्यारे , किडुकमिडुक इ० . [ तोडणे + मोडणे ]
-
क्रि. छाटणे , तुकडे करणे ;
-
क्रि. झिडकारणे , वेगळा करणे , संबंध सोडणे .
-
verb एखाद्या अवयवास त्याच्या मुख्य भागापासून वेगळे करणे
Ex. पवन बागेतील आंबे तोडत आहे.
Site Search
Input language: