मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तापत्रयेणाभिहतस्य घोरे सन्तप्यमानस्य भवाध्वनीश ।

पश्यामि नान्यच्छरणं तवाङ्‍घ्रि द्वन्द्वातपत्रादमृताभिवर्षात् ॥९॥

जे त्रिविध तापें तापले । जे कामक्रोधीं जर्जर केले ।

आशातृष्णा विसंचिले । जे निर्बुजले जन्ममरणें ॥८॥

संसारमार्ग अतिघोर । दुःखें नुल्लंघवे दुस्तर ।

ऐसे श्रमले जे नर । त्यांसी निजछत्र हरिपादपद्म ॥९॥

तुझ्या चरणारविंदापरतें । शरण्य न देखों अणिकांतें ।

यालागीं कायावाचाचित्तें । शरण भावार्थें तुज आलों ॥११०॥

छत्र निवारी केवळ ताप । चरणछत्राचें भिन्न रूप ।

त्रिविध तापेंसीं संताप । निरसोनि निष्पाप करी जन ॥११॥

एक शरण निजचित्तें । एक वैरें मिसळले तूतें ।

एक ते भजनभावार्थें । एक ते भयार्तें स्मरले तूतें ॥१२॥

एक ते सुहृदत्वें सगोत्र । एकाचें केवळ स्नेहसूत्र ।

एका अंगसंग कामतंत्र । एक आज्ञाधारक नेमस्त ॥१३॥

एवं नानापरी विचित्र । जिंहीं ठाकिलें चरणच्छत्र ।

भवभय जें महाघोर । तें त्यांसमोर हों न शके ॥१४॥

भक्त वैरी आणि सुहृद । अवघ्यां देणें निज ऐक्यपद ।

बाप उदारता अगाध । तूं स्वानंदबोध सर्वांचा ॥१५॥

होमें जें दीजे अग्नीवरी । तें अग्नी आपुल्याऐसें करी ।

मा अवचटें पडिल्यावरी । तेंही करी तैसेंचि ॥१६॥

एवं नानायोगें गोविंदा । जे मीनले तुझिया संबंधा ।

त्यांची निरसोनि संसारबाधा । समत्वें निजपदा तूं नेसी ॥१७॥

त्या तुझें चरणछत्र येथें । निवारी त्रिविध तापांतें ।

सदा वर्षे परमामृतें । शरण चरणांतें यालागीं ॥१८॥

ज्या संसारभयाभेण । तुझ्या चरणा आलों शरण ।

त्या भवभयाचें निरूपण । उद्धव आपण सांगत ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP