मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सोळावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४ था

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


गूढश्चरसि भूतात्मा भूतानां भूतभावन ।

न त्वां पश्यन्ति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते ॥४॥

सर्व भूतांचा हृदयस्थ । हृदयीं असोनि गुप्त ।

त्या तूतें भूतें समस्त । न देखत देहभ्रमें ॥९४॥

त्या देहभ्रमासी देवराया । मूळकारण तुझी माया ।

तेथें तुझी कृपा झालिया । माया जाय विलया गुणेंसीं ॥९५॥

मग सर्वत्र सर्वां ठायीं । सर्व भूतीं सबाह्य देहीं ।

तुझें स्वरूप ठायीं ठायीं । प्रकटें पाहीं सदोदित ॥९६॥

एवढें तुझे कृपेचे करणें । ते कृपा लाहिजे कवणें गुणें ।

यालागीं तुझ्या विभूती उपासणें । तुझे कृपेकारणें गोविंदा ॥९७॥

याचिलागी विभूतींची स्थिती । समूळ सांगावी मजप्रती ।

तेचि अर्थींची विनंती । पुढतपुढती करीतसें ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP