एकनाथी भागवत - श्लोक ४ व ५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अणिमा महिमा मूर्तेर्लघिमा प्राप्तिरिन्द्रियैः ।

प्राकाश्यं श्रुतदृष्टेषु शक्तिप्रेरणमीशिता ॥४॥

गुणेष्वसङ्गो वशिता यत्कामस्तदवस्यति ।

एता मे सिद्धयः सौम्य अष्टावौत्पत्तिका मताः ॥५॥

अणिमा महिमा लघिमास्थिती । या तिन्ही देहसिद्धीचे प्राप्ती ।

’ प्राप्तरिंद्रियैः ’ जे वदंती । ते जाण चौथी महासिद्धी ॥४३॥

प्राकाम्य श्रुतदृष्टांता । ते पांचवी सिद्धी गा सर्वथा ।

शक्तिप्रेरण ईशिता । हे जाण तत्त्वतां सहावी सिद्धी ॥४४॥

माझे धर्म जेथ वश होती । ते वशिता बोलिजे सिद्धांतीं ।

ते सातवी सिद्धी वदंती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४५॥

त्रिलोकीं भोग जो निरुपम । तो न करितां परिश्रम ।

इच्छामात्रें उत्तमोत्तम । भोग सुगम हों लागे ॥४६॥

इच्छील्या कामसुखाची प्राप्ति । त्रिभुवनींची भोगसंपत्ती ।

एकेच काळें अवचितीं । ते जाण पां ख्यातीं आठवी सिद्धी ॥४७॥

या अष्टमहासिद्धींची राशी । स्वभावें असे मजपाशीं ।

साधक शिणतां प्रयासीं । एकादी कोणासी उपतिष्ठे ॥४८॥

हे महासिद्धींची व्युत्पत्ती । इतर दाहा ज्या बोलिजेती ।

त्याही सांगेन तुजप्रती । यथानिगुती उद्धवा ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP