श्री परशुराम माहात्म्य - अध्याय ३१

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीपूर्णप्रज्ञगुरुवे नमः ॥

जयजया ईश्‍वरा जयजया फरशधरा जयजया विश्‍वैकवीरा लक्ष्मीवरा नमोस्तुते ॥१॥

जयजय श्रीकेशवा जय जया वासुदेवा जयजया देवदेवा चरणीं सेवा घेईजे ॥२॥

धर्म पुसे आश्चिर्यता कोणी देखिला नेत्रता परशुराम महेंद्र पर्वता साक्षाता कोणा जाली ॥३॥

बद्रिकाश्रमीं नारायण तेच महेंद्राश्रमीं परशुराम राहोनि करती भक्त काम त्याचें कथन सांग पां ॥४॥

तंव बोले गंगानंदन अत्यंत प्रेमें करुन आपुला वृत्तांत कथन सांगता जाला तयेवेळीं ॥५॥

तें चरित्र ठाऊक अंह्मा त्या रेणुकेचा महिमा ॥ वर्णी स्वयमेव ब्रह्मा पुराणांतूनीही पैं ॥६॥

ती रेणुका एकवीरा दैवत्य जालें नारीनरा देखतां पूजितां एकसरा परशुधरा संतोष होय ॥७॥

तें सांगीतलें महिमान महेंद्र पर्वतीं जाऊन देंखिलें नेत्रेंकरुन कोणी धर्मा तें ऐक ॥८॥

त्द्याश्रीकृष्णाचे अग्रज यदुकुळीं महाभुज जेणें जरासंध सहज जिंकोनि जय मिळविला ॥९॥

सर्ववीर पादाक्रांत करुनि आले मथुरेंत आणिली तेथें सर्व संपत यदुपुरी प्रख्यात तेधवां ॥१०॥

यदुपुरीचा राजा उग्रसेन श्रीकृष्ण रामप्रतापें करुन दिग्विजय मानी आपण जाण धर्मा तूं ही पैं ॥११॥

कोणे एके दिवसीं बैसले होते सभेसी तंव बळिराम श्रीकृष्णासी हातासी धरोनि बोलें ॥१२॥

गोमंतक महापर्वत दर्शनीय तो निश्चित तेथें जावयाचें मनांत तुमचे सहित असे पै ॥१३॥

तेव्हां आनमानपणें श्रीकृष्ण ह्मणे युत्ध प्रसंग येतां जाण तुह्मीं कोप करितां दारुण ह्मणोन आपणा येणें नसे ॥१४॥

ऐसें ऐकतां वाक्यास समजाविती श्रीकृष्णास आतां तुझेचिया आज्ञेस पालन करुं सर्वथा ॥१५॥

श्रीकृष्ण हांसोनि ह्मणती गोमंतकीं श्रृंगाल वसती तेथें सिंह कासया जाती कोणती शोभा तेथें असे ॥१६॥

किंवा आणीक कोणतें कारण यात्रा सज्जन समागम कीं तीर्थक्षेत्राचें अवलोकन करणें तरी चलावें ॥१७॥

पुनः सांगती बळिराम कोकणीं महेंद्राचळ उत्तम त्यादिव्य क्षेत्रीं परशुराम स्वयें आपण राहती ते ॥१८॥

तेथें अपार शिष्य ब्राह्मण गुरुपीठ तें महान तें आपणही पाहून गमन करुं गोमंतकीं ॥१९॥

बरें ह्मणती हांसोन निघाले श्रीकृष्ण बळिराम पुष्कळ देश उल्लंघून सत्द्य पर्वत उल्लंघिला ॥२०॥

महेंद्र पर्वतीं येतां देखिली परशुराम स्वरुपता जेवीं अभ्रावीण सविता पाहतां आश्चर्य नमावे ॥२१॥

जटाधारी मुद्रांकित पद्माक्षमाळा हातीं जपत कुशासनीं कृतोचित वेदांत सांगती शिष्यांसी ॥२२॥

चतुर्वर्णाचे शिष्य अपार देवर्षी सिद्ध विद्याधर यक्षगंधर्व किन्नर फणिवरही सेविती ॥२३॥

सर्वभूतें सर्वयज्ञ तीर्थेंक्षेत्रें मूर्तीमंत मान्य गंगादिक ही अन्य भार्गव चरण सेविती ॥२४॥

तें अपार देखोनि महिमान कृष्ण राम करिती नमन धन्य धन्य ह्मणती आपण आपले नी दर्शनें ॥२५॥

नमो भ्रुगुकुळ टिळका नमो विश्‍व प्रतिपाळका नमो अनंत ब्रह्मांड नायका ॥ दुरितांतका नमोस्तुते ॥२६॥

नमो अग्रपूज्या महन्मखा नमो नारायणा नरसखा नमो उपनिषद्वेद मुखा अनंत सुखा नमोस्तुते ॥२७॥

नमो वासुदेवा महाभागा ॥ नमो सर्वेश्‍वरा सर्वगा नमो नित्य तम पारगा अगाहे सर्वोत्तमा तुज नमो ॥२८॥

नमो चिदानंद ओघा नमो परशुधरा अनघा नमो नाशक तूं महदघा बघा स्वभक्तासी नमोते ॥२९॥

पंचभेद जो सनातन तेथें तुमच्या कृपेकरुन मोहित नसे सहस्त्रवदन ती कृपा मज लागून असो ॥३०॥

अंश कलाविभूती अवतार तुझे आहेत ते अपार तरी भक्तावरी करोनि उपकार त्वां विस्तार केला पुराणीं ॥३१॥

कृष्ण संकर्षणानीं स्तवन करोनि आपलें नामाभिधान सांगती आदरेंकरुन दाखवून भेदासी ॥३२॥

यदुकुळ प्रख्यात सर्वत्र तेथें वसुदेव महापवित्र त्याचे अह्मीं आहोत पुत्र तुमच्या श्रवणीं असेल पैं ॥३३॥

सांगतां तें परशुराम करिती ते आशीर्वचन अतिआनंदेंकरुन विचारिती हांसोनि ॥३४॥

येथें आलां कशाकरितां विश्‍वैक वंद्य तत्वतां भार्गवें हेंचि बोलतां सांगती ते प्रसन्नता ॥३५॥

पहावया तें गोमंता इच्छा असे आह्मां आतां आपुलें क्षेत्र पाहतां होय जीवा कृतार्थता ॥३६॥

तुह्मीं प्रगटाजा स्थळीं तेथें राहे तीर्थावळी स्नानदान कळिकाळीं करी जो त्या भीये कली ॥३७॥

बोलोनि इतुकें दोघे दिशे दक्षिण अवघे करवीर पुरीं गेले वेगें शत्रूपुष्कळ जिंकिले ॥३८॥

इतुकें सांगतां शौनक शंकाविचारिती देख ईश्‍वरावतार अनेक तेथें विशेषाऽ विशेषक आहे कीं ॥३९॥

ऐसें विचारितां सूत सांगे आश्चर्य करीत ईशावतारी ही जो शंका घेत सत्य मूर्खत्यासी ह्मणा ॥४०॥

पूज्य पूजक नीच उंच असुरांसीते मोहन जाणाच आभेदावतारीं साच दीपापरी जाणिजे ॥४१॥

श्लोक ॥ सर्वावताराभिन्नोपि सर्वशक्तीरपिस्वयं ॥ पूज्य पूजकनीचोच्चं मोहनाय दुरात्मनां ॥इति॥१॥

सर्वांतूनि असोन सर्वांहूनि वेगळा जाण सदानंद चैतन्य घन ॥ विज्ञानरुप श्रीहरी ॥४२॥

आतां ऐका पंचभेद सत्य जो वर्णिती वेद तो जाणता चिदानंद विष्णुपद पाविजे ॥४३॥

जीवांचा जडांचा भेद परस्पर जीवांचा भेद परस्पर जडांचा भेद जीव जडां भेद ईश्‍वरासी ॥४४॥

जो हा पंच भेद न जाणित ॥ त्यासी नाहीं खरी समजूत तेणें ते अंध तमाप्रत जाती सूत ह्मणे ॥४५॥

अनंत वेदाच्या राशी जाणावया शक्ती नसे कोणासी ह्मणोन पांचवे वेदासी ख्याती जाहली असे ॥४६॥

पहिला ऋगवेद दुसरा यजुरवेद तीसरा सामवेद अथर्वण वेद चवथा असे ॥४७॥

पांचवा वेद महाभारत नारद पंचरात्रागम निश्चित तेथोन पुराणें प्रगटत द्विविध संज्ञित असतीं तीं ॥४८॥

ऐका पांच वेदाच्या उत्पत्ती सांग वेद उपवेद ह्मणती ब्रह्माच्या चार मुखानीं पावतीं चार ऋषी प्रती आदौते ॥४९॥

वेद घेवोनी ऋषींनीं आलेते बदरी वनीं बैसले त्यांच्या विचारणीं कांहीं तेव्हां कळेना ॥५०॥

तंव संकटीं पडोनि मुनिजन केलें त्याणीं हरिभजन ते काळीं ईश्‍वर नारायण दयेंकरुन अवतरला ॥५१॥

सत्यवतीच्या पासून जाले पराशनंदन बदरीवनीं तेथोन येवोन ऋषी उद्धरिले ॥५२॥

तरी स्त्री शूद्र द्विज बंधु यांसी नाहीं जाला बोधु मग भारत महानंदु पांचवा वेद प्रगटविला ॥५३॥

जेथें धर्म उपधर्म ज्ञानविज्ञानें परिपूर्ण ऐस्या इतिहासें करुन जगतीं तृप्तता न होय ॥५४॥

तेव्हां जगाच्या उद्धारार्थ प्राप्ती चतुर्विध पुरुषार्थ भक्तिज्ञान वैराग्यार्थ ॥ आदि भागवत केलें ॥५५॥

जाली अठरा हजार संहिता ती भक्ती ज्ञान वैराग्यता तेथें धर्मोपधर्म विस्तारता जाहली नसे ॥५६॥

धर्म ह्मणजे सुरांचा उपधर्म तो असुरांचा जैसें पूर्वी सुधा मद्याचा केला उद्भवस्येंची ॥५७॥

एकेक ह्मणतां जाली बहुत अठरा महान प्रख्यात तितुकींच उपपुराणें करीतां छत्तीस संख्याती जाली ॥५८॥

ऐका श्रोते सावधान संख्या सह अठरा पुराण आणीक सांगेन नामाभिधानें उपपुराणांचीं ॥५९॥

आदी श्रीमद्भागवत अष्टादश सहस्त्र संख्यात तितुकेंचि ब्रह्मवैवर्त सतरा हजार कूर्मजाणा ॥६०॥

पंचावन्न हजारें करुन पद्मपुराण दिव्य जाण ब्रह्मपुराण असे गहन दशसहस्त्र संख्याक जाणा ॥६१॥

मत्स्य पुराण चवदा हजार विष्णु पुराण तेवीस हजार वाराह चोवीस हजार एकोणतीस गारुड जाणा ॥६२॥

एक्यैशीं हजार एकशत स्कंद पुराण प्रख्यात नऊ हजार मार्कंडेय ह्मणत ॥ ब्रह्मांड पुरांण बारा हजार ॥६३॥

अकरा सहस्त्रलिंग पुराण भविष्योत्तर पुराण साडे चवदा हजार जाण अग्नी पंधरा हजार चारशें ॥६४॥

दशसहस्त्र वामन चोवीस सहस्त्रवायु पुराण पंचवीस हजार नारद पुराण एवं महापुराणें हीं ऐसीं ॥६५॥

आतां ऐका उपपुराणें सांगेन त्यांची नामें तंत्र भागवत हंसपुराणें मग जाणे विनायक ॥६६॥

विष्णु धर्मोत्तर आदित्य बृहद्ब्रह्मांड विष्णु रहस्य आणि भविष्य त्पर्वषष्ठय शैव नारसिंह रेणुका ॥६७॥

बृहन्नारद देवी पुराण तत्वसार वायुप्रोक्त यम नारद नंदी प्रोक्त पाशुपत असे जाणा ॥६८॥

हीं उपपुराणें सांगीतलीं मिळूनि छत्तीस जाहलीं हें सांगीतलें ऋषी मंडलीं ऐकतां वनमाळी संतोषे ॥६९॥

आणीक स्मृत्या सूत्रें असती सर्वसार ब्रह्मसूत्रें ह्मणती वेदार्थ निर्णयीं मुख्य तीं ॥ द्विज जाती विषयींच्या ॥७०॥

सर्व शास्त्राचा विचार ध्यावा एक श्रीधर करा आपुला सदाचार त्यासी अर्पुनी ॥७१॥

हा परंपरागत धर्म घेवोनि वागती सर्व वर्ण त्यांमध्यें गुरुब्राह्मन ब्रह्म जाणती तें ॥७२॥

ब्रह्म परमात्मा देव देव अखिलेश्‍वर वासुदेव त्याचे चरणीं धरोनि भाव भार्गव चरित्र वदलो ॥७३॥

जगतीं कलिराजा झाला धर्म अवघाचि बुडाला भक्तिमार्ग स्थिरावला दुर्मीळ देशीं किंचित ॥७४॥

कर्म मार्ग भक्तीमार्ग, द्विजजाती विषयीं अपार वेदांनी सांगीतला साचार ईश्‍वर संतोषाकारणें ॥७५॥

स्नान संध्या नित्य नैमित्तिक यज्ञ हा द्विज जातीचा कर्म मार्ग मुख्य आणि पूजन श्रवणादिक अन्य भक्तिमार्ग जाणा ऐसा ॥७६॥

नित्य नैमित्तिक कर्म जें जें करावें आपण तेथें जाणोनि नारायण आणि तें त्यासीच अर्पिजे ॥७७॥

आणि ईशप्रीतीचे धर्म जे जे वदे पंचारात्रागम ती भक्तीमार्ग जाण मोक्ष प्राप्तीला ॥७८॥

अधोक्षज भक्ती वांचून सर्व आहे व्यर्थजाण जन्म मरणा कारण श्रोते जनहो ॥७९॥

श्लोक ॥ धिग् जन्मन स्त्रिवृद्धिद्यां धिग् व्रतंधिग् बहुतज्ञतां ॥ धिक्कुलं धिक्रियादाक्ष्यं विमुखायेत्वधोक्षजे ॥१॥

स्वस्तिश्री परशुराम विजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु ॥ एकत्रिंशोऽध्या गोड हा ॥३१॥श्रीबाणदर्पहरणार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP