मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पाचवा|
श्लोक ७ वा

एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


रजसा घोरसङकल्पाः कामुका अहिमन्यवः ।

दाम्भिका मानिनः पापा विहसन्त्यच्युतप्रियान् ॥७॥

ते काय करितील बापुडे । शुद्ध सत्त्वें सांडिलें फुडें ।

मग रजोगुणें कामाकडे । झाले धडफुडे अतिकामी ॥९५॥

तेव्हां उर्वशीच्या अतिआवडी । स्वर्गभोगाची अतिगोडी ।

यालागीं यागपरवडी । पुण्याची जोडी जोडूं धांवे ॥९६॥

तेथ मंत्रतंत्रद्रव्यशुद्धी । नाहीं यागयजनविधी ।

तेणें स्वर्ग नव्हेचि त्रिशुद्धी । ठकले दुर्बुद्धी अविहिताचारें ॥९७॥

तया अलब्ध कामासाठीं । सर्वागीं क्रोधु उठी ।

जेवीं परिपाकापाठीं । धरी कडुवटी आंबिलकांजी ॥९८॥

जंव जंव पिकिजे कोरिफडें । तंव तंव कडूपण गाढें ।

तैसा कामनाशापुढें । क्रोध वाढे अत्युग्र ॥९९॥

क्रोध काळिया-नाग खरा । देतु द्वेषाचा फुंफारा ।

घाली पूज्यतेच्या आकारा । धुधुःकारा साधुनिंदेचा ॥१००॥

ऐसा क्रोधाचा वसौटा । होय तमाचा चोहटा ।

मग दंभाचे नाणवठां । हीनकसाचा खोटा विकरा मांडी ॥१॥

मग जो जो भेटे भेटे प्राणिया । त्यासी अभिचारयोगक्रिया ।

लावूनि बाहेर मुद्रिया । पापाचारें पापिया प्रवृत्ति मांडी ॥२॥

स्वधर्माचा फाडोवाडें । प्रतिपदीं पाडा पढे ।

अधर्माची खाणी उघडे । समूळ कुडें कर्माचरण ॥३॥

तेणें पापाचार पिके । गगनचुंबित जाहलीं टेंकें ।

मग अधमोत्तम एकें तुकें । घालिती यथासुखें अधर्मघालणी ॥४॥

तेथ ठाणें देऊनि अभिमाना । वाढविती ज्ञानाभिमाना ।

मग निंदिती साधुजना । विपुळाती सज्जना उपहासयुक्त ॥५॥

जगीं सर्वत्र पाहती दोष । तथापि देखिल्याही निर्दोष ।

तरी करुनियां उपहास । करिती सावकाश असदारोपणें ॥६॥

यापरी अभिमानविदां । पापबुद्धीची दृढ बाधा ।

सहजानुवादें सदा । साधुनिंदा अनुवादती ॥७॥

जे कां हरीतें आवडती । जे सदा करिती हरिभक्ती ।

त्यांतें सदा उपहासिती । अनुवादती गुणदोष ॥८॥;

व्दिज स्मरती हरिनाम । त्या नांव म्हणती अधर्म ।

ऐकोनि हरिकीर्तनसंभ्रम । म्हणती हें परम महापाप ॥९॥

ऐसा जो हरिनामातें निंदी । हरिकीर्तनीं दुर्बुद्धी ।

तो खळ जाणावा त्रिशुद्धी । भजनापवादी दुर्जन ॥११०॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP