मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २५

क्रीडा खंड - अध्याय २५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

सनक सनंदन यांना, केलें सर्वज्ञ पाहुनी भक्ती ।

केली विनायकाची, मूर्ती सुंदर करुन ती भक्ती ॥१॥

हेमाचें रत्‍नांचें, मंदिर निर्मित करुन त्यामाजी ।

मूर्ती स्थापित केली, वापी निर्मित तया स्थळामाजी ॥२॥

त्या वापीला देती, नाम असें तें गणेशकुंड बरें ।

पूजित काशीराजा, सर्व जनांसहित मूर्ति एकसरें ॥३॥

भूपति विनायकासह, परतुन नगरांत तेधवां आला ।

ऐशा साक्षात्कारा, पाहुन भूपति मुदीत तो झाला ॥४॥

विधिला व्यासें पुशिलें, कश्यपसुत प्रथम जात विप्रघरीं ।

गेला नाहीं इतरां, भक्त जनांच्या घरास त्या नगरीं ॥५॥

त्या विप्राला दिधलें, पुष्कळ धन कारणास सांगावें ।

त्याची अनन्यभक्ती, कारण हें कथित कीं मनोभावें ॥६॥

पूर्वी एका व्याधें, गणपतिला पूजिलें शमीपानें ।

भक्तीनें वश होउन, दिधली मुक्ती सलोकता प्रभुनें ॥७॥

तस्मात् भक्ति श्रेष्ठ, व्यासा जाणे विधी कथी साच ।

भृगु सांगती कथा या, भूपालागीं पुनीतशा साच ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP