मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
नाम हें सुंदर रुप हें सुं...

भक्ति गीत कल्पतरू - नाम हें सुंदर रुप हें सुं...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


नाम हें सुंदर रुप हें सुंदर ध्यान मनोहर ।

अखंड ध्यातां चित्त हरीरे स्वरुपीं होई स्थीर ॥धृ०॥

नामाचा तव महिमा थोर वर्णावा किती ।

अगणित तव हे गुण वर्णाया न चले मम मती ।

रुप तुझें परी प्रेमें पाहातां चित्तां ये शांती ।

श्रवण करीतां तव गुण लीला तन्मय होय वृत्ती ।

म्हणुनी सगुणरे भक्ति तुझी ही आवडे मज फार । अखंड ध्यातां० ॥१॥

सगुण तुझें हें ध्यान करीतां प्रगट तूं होसी ।
म्हणुनी भक्तवत्सल नाम हें शोभें हरी तुजसी ।

भक्तकाम तो पूर्ण कराया साह्य त्या करिसी ।

शेवटीं त्यासी मुक्‍त करुनी वैकुंठा नेशी ।

भक्‍त रक्षुनी धर्म स्थापण्या धरिसी अवतार ।अखंड ध्यातां० ॥२॥

तूं जरी शीव तरी मी जीव प्रतिबिंबची तूझें ।

तुजवांचुनी जगतीं देवा कोण असे माझे ।

दीनदयाळा भक्‍तवत्सला घालुं कुणा ओझें ।

पतीतपावन कीर्ति तुझी ही त्रिभुवनीं गाजे ।

म्हणुनी चरणीं लीन ही वारी देवा निरंतर ।अखंड ध्यातां० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP