मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
हरीरे तुझी ही करणी । वर्ण...

भक्ति गीत कल्पतरू - हरीरे तुझी ही करणी । वर्ण...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


हरीरे तुझी ही करणी । वर्णूं न शके मम वाणी ॥धृ०॥

तूं रंकाला राव करीसी । सुखसागर दीनाला देसी ।

भक्ताची सेवा करिसी । त्या घरीं भरुनी पाणी । हरीरे० ॥१॥

तू त्रैलोक्याचा नाथ । पाळीसी दीन अनाथ । पुरवुनी मनोरथ ।

जावुनी त्यांच्या सदनीं । हरीरे० ॥२॥

हें अज्ञ बालक तूझें । सर्वस्व तुजवरी ओझें ।

पुरवावें कोड माझें । करी गोड अभंग वाणी । हरीरे० ॥३॥

ते गोड गोद तूझे गुण । गाईन अभंग वाणीन ।

प्रेमाने रंगु दे मन । वारी ही शरण चरणीं । हरीरे० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP