मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मना धरी छंद . । जेणें होई...

भक्ति गीत कल्पतरू - मना धरी छंद . । जेणें होई...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


मना धरी छंद. । जेणें होईल ब्रम्हानंद ॥धृ०॥

छंद लागू दे स्वस्वरुपाचा । निरास करी या चौ देहाचा ।

विचार करी तूं अंतरीं याचा । तुटेल मग बंध ।

जेणें होईल ब्रम्हानंद । मना० ॥१॥

बोध परिसुनी सद्‌गुरुचा । अभ्यास करी नित्य त्याचा ।

ब्रम्हरुप होशील साचा । मग नित्यानंद ।

जेणें होईल ब्रम्हानंद । मना० ॥२॥

जिकडें पाहे तिकडे तेची । आस्ती भाती प्रिय आत्माची ।

वार्ता नाही नामरुपाची । सच्चिदानंद ।

जेणें होईल ब्रम्हानंद । मना० ॥३॥

ऐसा छंद ज्या लागला । जन्ममृत्यू नाही त्याला ।

वारी म्हणे प्राप्त झाला । त्या गोविंद ।

जेणें होईल ब्रम्हानंद । मना० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP