मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
पजा अवसर झाला ॥ विघ्नराज ...

मोरया गोसावी - पजा अवसर झाला ॥ विघ्नराज ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


पजा अवसर झाला ॥ विघ्नराज संतोषला ॥

तुह्मी चलावें चलावें ॥ सुखे सेज मंदिरासीं ॥धृ०॥

मंचक घातला सुंदर॥ वरि पासोडा पितांबर ॥तु०च० ॥२॥

वरि सुमनाचे अरुवार ॥ वरि पहूडले विघ्नहार ॥तु०च० ॥३॥

सिद्धि बुद्धि दोही हातीं ॥ विंझणवारे जाणविती ॥तु०च० ॥४॥

मोरया गोसावी दातार ॥ चिंतामणी दिधला वर ॥

तुम्ही चलावें चलावें ॥ सुखें सेजमंदिरासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP