मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
अकळु अवतार कर्‍हे पाठारीं...

मोरया गोसावी - अकळु अवतार कर्‍हे पाठारीं...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


अकळु अवतार कर्‍हे पाठारीं ॥ ब्रह्म कमंडलु गंगा ॥

रहिवास तयें तिरीं ॥ भीमकुंड गणेश तीर्थ ॥

तेथिल महिमा थोर ॥ तेथें केलिया पैं स्नान ॥

कर्मा (दोषा) नाहीं ऊरी ॥ जय जय जय जय जय लंबोदरा ॥

सकळा सिद्धिचा तूं दाता होसिल विघ्नहरा (मोरेश्वरा) ॥१॥

तुझें केलिया भजन (पूजन) चुकतिल वेरझारा ॥

तूं भक्त जन वत्सल कृपाळू बा मोरेश्वरा ॥२॥

भाद्रपद शुद्ध चतुर्थिसी ॥ चार्‍ही द्वारें केलिया मुक्ति होय ॥

चारि दिवस उपवास करोनिया चारि पाहे ॥

एक निष्काम करिती सायुज्यता होय ॥

एक कामना इच्छिती इच्छाफळ (पूर्वफळ) देते आहे ॥३॥

पूर्वद्वारीं ती मांजराई आदिशक्ति माया ॥

दक्षिणद्वारीं ती आसराई भवानी मोहंमाया ॥

पश्चिमद्वारीं ती वोझराई माता वंदुनिया ॥

उत्तरद्वारीं होय मुक्ति मुक्ताबाई देखिलिया ॥४॥

माहाद्वारीं ती कृपाळु माता गवराई ॥

दृष्टि सन्मुख जननीं जवळी उभा भैरवभाई ॥

वृक्ष उत्तम वामभागीं आदिस्थान तये ठाई ॥

वृंदा वनीचा महीमा तो मी वर्णू (बोलू) कांई ॥५॥

ऐसा परिवार सहित मयुर पुरीं (गांवी) आहे ॥

भक्त येतील यात्रेसी तयाचें चित्त (मन) पाहे ॥

मोरया गोसावी दास तुझा तज ’नित्य’ (जवळी आहे) ध्याये ॥

प्रतिमासी दर्शन लोटांगणी (येतो आहे) जाये ॥ जय जय० ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP