मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
कष्टतोसि भारी हो मज दीना ...

मोरया गोसावी - कष्टतोसि भारी हो मज दीना ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


कष्टतोसि भारी हो मज दीना कारणें ॥

क्रम थोर जाला तुज भारि मी काय करुं ॥१॥

’बहु’ अन्याइ मी फार हो किती वाहसिल माझा भार ॥

माय माझि कृपाळू तूं फार हो मज लागीं ॥२॥

धेनु जाय चरायासी वेगि येई वत्सा पासि ॥

तैसा स्नेहाळु तूं होसी रे कृपावंता ॥३॥

माझें नाहीं पुण्य फार हो ॥

किती वाहसील माझा भार ॥

नाहीं मज घडली सेवा फार हो तुझी देवा ॥४॥

’ऐसा’ अन्यायीं मी आहे हो (भक्ति) नकळे मज कांहीं ॥

कर्मे घडली नाहीं फार हो (मायबापा) मोरेश्वरा ॥५॥

नवविधाही भक्ति हो नाहीं मज ठावकी ॥

पूर्व पुण्य नाहीं माझे रे कृपावंता (दयावंता) ॥६॥

आझून बापा मज हो नव्हतें रे कळलें ॥

पतित पावन नाम साच केले ॥७॥

दीन वचनि विनवितो हो नाम तुझें मागतो ॥

चिंतामणी दास हो विनंति करि ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP