मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
विमानांचे घोष वाजती असंख्...

संत तुकाराम - विमानांचे घोष वाजती असंख्...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


विमानांचे घोष वाजती असंख्य । सुरु झाला डंका वैकुंठीचा ॥१॥

शब्दांचा विश्वास झाली आठवण । करा बोळवण सज्जन हो ॥२॥

आले विष्णुदूत तेचि प्रेममूर्ति । अवसान हातीं सांपडलें ॥३॥

झाला पाठमोरा इंद्रायणी तळीं । नामघोष टाळी वाजविली ॥४॥

प्रथम तो पाय घातला पाण्यांत । राहिली ते मात तुका म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP