गुरूची आरती - दावुनि साक्षई अंतरि भवभय ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


गुरूची आरती

दावुनि साक्षई अंतरि भवभय छेदिलें ।

कारण भेदुनि करणां चरणी वधीले ।

सर्वहि जिन्मय निश्चल या रिती बोधीले ।

वेधाबोधापरते घनमंडल दीले ॥ १ ॥

जय देव जय देव जय सद्‌गुरुनाथा ॥

आरती आरती तव पदिं ठेवूं निजमाथा ॥ धृ. ॥

समता देऊनि ममता माया निरसीली ।

सबाह्य अभ्यंतरिं ही संवित्‌ प्रगटली ।

अलभ्यलाभे देहबुद्धीं निवटीली ।

द्वैताद्वैता-परती निजप्राप्ती दिधली ॥ जय. । २ ॥

त्रिपुटी ग्रासुनि लावुनि मुळानुसंधाना ।

प्रेमानंदे दिधले समाधिव्युत्थाना ॥

उदये अस्त गेलेंऽस्तमाना केशवयोगी भोग निजात्ममहिमाना ॥ जय देव. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000