गुरूची आरती - जय देव गुरुराया । ब्रह्...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


गुरूची आरती

जय देव गुरुराया ।

ब्रह्मानंद हे आचार्या ॥

आरती ओवाळीतों ॥

स्वामी रघुराया ॥ धृ. ॥

अज्ञानभ्रांतियोगें ।

जगी लोपले ज्ञान ॥

प्रगटोनि जनस्थानीं ।

करुनि अज्ञानखंडन ॥

अधिकारी शिष्यजीव ।

करि ब्रह्मपरिपूर्ण ॥ १ ॥

तत्वंपदजीवेशांची छेदुनि वाच्यांश उपाधी ।

लक्ष्यार्थि साक्षिबोधें ॥

करिसि ऎक्य असिपदी अखंड स्वस्वरूपीं ॥

स्थापिसी तूं परमानंदी ॥ २ ॥

जगद्‌भ्रमवितर्ताचें ।

अधिष्ठान तूं साचार ॥

अनंतब्रह्मांडांचे ।

खाली मध्ये आणि वर ।

मौनी म्हणे तूंची सर्व ॥

रामा व्यापक निर्धार ॥ जय. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000