गुरूची आरती - शांतिकल्याण सहजानंद आरती ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


गुरूची आरती

शांतिकल्याण सहजानंद आरती , सहजानंद आरती ।

अखंड ओंवाळूं कृष्णा कैवल्यपती ॥ १ ॥

आरत रे माझ्या प्राणवल्लभा, माझ्या प्राणवल्लभा ॥

जिकडे पहावा तिकडे अवघा सद्‌गुरू ऊभा ॥ धृ. ॥

अलक्ष्यांचें लक्ष्य, तेथें कैचें लक्षण ।

सद्‌गुरुची आरती न कळे जन ॥ २ ॥

नित्य हरिकथा नित्यानंददिपवाळी ।

नित्य गणेशदास नीरांजन ओंवाळी ॥ ३ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000