मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
देहत्रय अवतारा तापत्रय हर...

दत्ताची आरती - देहत्रय अवतारा तापत्रय हर...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी ।

अक्षय सुख अवदुंबर छाये विचरसी ॥

श्रीकृष्णातटिं रहुनि दासा उद्धरिसी ।

जढमूढां तारया अवतार धरिस ॥ १ ॥

जय जय श्रीदत्तात्रय औदुंबरवासी ।

मंगल आरति करितो मम भवभयनाशी ॥ धृ. ॥

काय तुझा महिमा वर्णावा आतां ।

मारिसि भूतसमंधा सक्रोधें लाता ॥

नानारोग दुरत्वय तव तीर्थ घेतां ।

पुनरपि श्रवण न ऎकति गदरिपुची वार्ता ॥ जय. ॥ २ ॥

तुझें क्षेत्र मनोहर या अवनीवरती ।

त्यातें पहातां वाटे स्वर्गासम धरती ॥

आनंदे द्विज भारत पारयण करिती ।

त्रिकाळ सप्रेमानें करिती आरती ॥ ३ ॥

मी अधसागर तूं हो अगस्तिऋषि देवा ।

प्राशूनि वारी दे मज त्वत्पदिंचा ठेवा ॥

बाधों ना मज किमपि प्रापंचिक हेवा ।

दास म्हणे हे बाळक आपुल्या पदिं ठेवा ॥ ४ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP