मारुतीच्या आरत्या - जय जय अंजनिबाला । पंचारत...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


मारुतीच्या आरत्या

जय जय अंजनिबाला । पंचारति ही करितों तुजला ॥ धृ. ॥

सीताशुद्धिस्तव जावोनी ॥ जाळीली लंका ।

दुष्ट वधोनी ॥ जानकिसह रामाला ।

नेसी अयोद्धे सुखधामाला ॥ जय. ॥ १ ॥

चरणी शरण मी भावें आलो । ब्रह्म सदोदित ह्र्दयी खेळो ॥

ऐशा दे ज्ञानाला । धन्य करी या बलवत्कविला ॥ जय. ॥ २ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000