मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
दिसली पुनरपि गुप्त जाहली ...

संगीत सौभद्र - दिसली पुनरपि गुप्त जाहली ...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


दिसली पुनरपि गुप्त जाहली प्रिया सुभद्रा घोर वनी ।
येथे सुंदरी कैशी आली हेच कळेना मज अजुनी ॥धृ०॥
माझ्या वेषा खरे मानुनी हलधरही लागत भजनी ।
त्रिकालज्ञ परि मोह पावले कैसे न कळे गर्गमुनी,
कपती कृष्णाचीही बुद्धी गेली कैशी ती भुलुनी ।
या सर्वांचा विचार करिता जातो मूढचि होवोनी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP