अंगाईगीत - पालख पाळणा मोत्यांचा खेळ...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


अंगाईगीत

पालख पाळणा मोत्यांचा खेळणा

जोजवीतें बाई माझा लाडका चिमणा

शिंपांचा मळा बाई स्वातीनं शिंपला

मोतीं मोतीं टिपुन तुझ्या छताला गुंफला

सागर सांडूनी माणीक धुंडूनी

चंद्र सूर्य जडविले इवल्याशा गगगीं

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-25T23:43:37.7400000