मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
काय झाले , काय झाले कस...

बडबडगीत - काय झाले , काय झाले कस...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


काय झाले, काय झाले

कसली हाकाटी ?

’बाहुलीच्या बोटातली

हरवली अंगठी’

घरात बाहेर

शोधून दमली

बिचारी बाहुली

रडवेली झाली

बाहुली म्हणाली,

"काय करु बाई

बाहुल्याला कळले तर -

धडगत नाही."

बाहुल्याला कोणी

विचारायच्या आत

बाहुल्याने ठेवले

कानावरती हात !

N/A

References :

कवी - मा. गो. काटकर

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP