मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
कोण आला ? - वारा आला ...

बडबडगीत - कोण आला ? - वारा आला ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


कोण आला ? - वारा आला

कसा आला ? - वाहत वाहत

कोण आला ? - मासा आला

कसा आला ? - पोहत पोहत

कोण आला ? - पक्षी आला

कसा आला ? - गिरकत गिरकत

कोण आला ? - तारा आला

कसा आला ? - झळकत झळकत

N/A

References :

कवी - अनंत भावे

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP