संग्रह ३०१ ते ३२०

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


३०१.

लहानपणीं तुळशीला घालीत होतें पळी पळी पाणी म्हणून आतां झालें

x x x रावांची राणी.

३०२.

काळी चंद्रकळा नेसतें कसून,

x x x रावांनीं दिलेले पेढे खातें हसून.

३०३.

काळी चंद्रकळा तिला कस्तुरी चांदणी,

x x x रावांचं नांव घेतें मोहित्यांची राणी.

३०४.

मागं पुढं गोठ पाटल्या, मधीं लेतें छंद,

x x x रावांचं नांव घेतें गलबला करा बंद.

३०५.

साताराच्या सडकेनं घोडयांची लाईन,

x x x रावांचं नांव घेतें भावांची बहीण.

३०६.

द्राक्षांच्या वेलीला त्रिकोणी पान, बाबा हिंडले हिंदुस्थान,

तेव्हां सांपडले x x x राव छान.

३०७.

भाग्य उजळलं पत्‍नीचं, अंगठीवर चमकला हिरा, आकाशांत चमकला तारा,

x x x रावांचं नांव घेतें हाच माझा भाग्योदय खरा.

३०८.

नव्या संसारांत स्त्री असावी हौशी,

x x x रावांचं नांव घेतें मंगलकार्या दिवशीं.

३०९.

एकादशीच्या दिवशीं विठ्‍ठलाला वहातात तुळशी,

x x x रावांचं नांव घेतें मंगळागौरीच्या दिवशीं.

३१०.

अंबाबाईच्या देवळांत सोन्याची आळी,

x x x रावांचं नांव घेतें संध्याकाळच्या वेळीं.

३११.

राम बसले रथांत, सीता बसली अंकावर,

x x x रावांचं तेज झळके माझ्या कुंकवावर.

३१२.

नीलवर्ण आकाशांत चमकतो शशी,

x x x रावांचं नांव घेतें संक्रांतीच्या दिवशीं.

३१३.

कनकाच्या कोंदणांत हिरकणी शोभते,

x x x रावांची नि माझी जोडी अशीच खुलून दिसते.

३१४.

सोन्याचं तबक झाकतें शालूच्या पदरानं, शीलवती मी

x x x रावांचं नांव घेतें विनयानं.

३१५.

शोधिली वसुंधरा प्रेमलुब्ध माता,

x x x रावांची मी सुशीला कांता

३१६.

उभारला ज्यांनीं उत्सव, मैत्रिणी माझ्या हौशी

x x x रावांचं नांव घेतें मंगल दिवशीं.

३१७.

अक्राळ विक्राळ वीर चमकते ढगात

.x x x रावांचं नाव घेते धन्य़ झालें मनांत

३१८

खोल्यांत खोल्या सात खोल्या , उघडून गेले आंत ,मधल्या खोलीत ताट

लाडवानं भरलं काठोकाठ , ताटाला केली खूण x x x रावांचे नांव घेते

x x x ची सून

३१९.

तुळशी तुळशी , तूं माझी काशी, वृंदावनी एकादशी,पाणी घालीन गंगेच,

विमान येईल महाविष्णूचे , विष्णू तूं गाता, जवळ होती रुक्मीणी माता,

तिन सांगितल्या दोन खुणा, आम्ही अज्ञान लेकरुं कृपा करुन चालवावी माय

भक्तीनं वाढ्वावे सन्मानाने दे सत्यनारायणा आशीर्वाद, तुला करते भक्तिचा नमस्कार.

३२०.

तुळ्शी तुळशी चंद्रभागा सुंदरी , तुझ्या उदकांत भिजली माझी निरी , हाती

ओल्या पडदिनीच्या निर्‍या उभी द्वारकेच्या दारी, भेटु दे गोकुळचा श्रीहरी.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP