मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
कुणि असेल ग !

कुणि असेल ग !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


कुणि असेल ग असेल बोबडकांदा

खुदुखुदु हसत एखादा. १

कुणि असेल ग, असेल, मैनाराणी !

कुठ गात पोपटावाणी. २

कुणि असेल ग असेल चिमणा रावा

कुठ तरी कुठिल तरि गावा. ३

कुणि असेल ग, असेल त्या शेतांत

खुसुखुसू ग हुरडा खात. ४

कुणि असेल ग, असेल लाडिक माझा

स्वप्नांतिल तुझिया राजा ५

नदिपल्याड ग, पल्याड त्या रानाच्या

कुणि असेल ग भाग्याचा. ६

कुणि येईल ग, येइल ग न्यायाला

या नाजुकशा कमळाला, ७

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - अक्रूर

ठिकाण - लष्कर -ग्वाल्हेर

दिनांक - १३ मार्च १९३५

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP