मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
भोग कुणा सुटले ?

भोग कुणा सुटले ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


भोग कुणा सुटले जगिं या ? ध्रु०

सुखदुःखांची अलक्ष्य भेसळ,

द्व्म्द्‌मूल संसार अमंगल !

येथे कसलें सुख तें केवल ?

मुनिमन या विटलें १

दास जयांचा झाला श्रीहरि

तयां पांडवां सुटली नगरी,

दास बनुनि राबति परक्या घरिं,

मनोदुर्ग फुटले. २

श्रीरामा वनवास भूवरी,

त्यावरि वैरी हरी नोवरी,

दीन वनोवनिं तो वणवण करि, ३

सुख त्याला कुठलें ?

रे रे माझ्या विषण्ण ह्रदया,

दुःखा दे मुख धीर धरुनिया !

स्मरुनि हरी वागेल जो तया

भोग असुनि मिटले ! ४

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - अंजनी

राग - असावरी

ठिकाण - लष्कर - ग्वाल्हेर

साल - १९२९


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP