मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
उखळांत दिलें शिर ! काय अतां !

उखळांत दिलें शिर ! काय अतां !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


उखळांत दिलें शिर, काय अतां ?

दणकवा मुसळ ढोंग न करितां ! ध्रु०

दुबळ्यांचे बळ केवळ दुस्तर,

करील कैसें दिव्य भयंकर,

बलोद्धतांची मोडिल कंबर,

जग चकित होउं द्या हें बघतां ! १

माय, तुझा तो चिलया बाळा

विसरुं कसा ? कांडिता तयाला

अश्रुबिंदु त्या एक न आला,

बांधिलें अनंता बलवंता. २

प्रल्हादहि सत्याग्रहरत तो,

आइ, आठवे सदैव सुत तो,

ढळे न तिळभर छळीं अमित तो,

पशु करुनि सोडिलें भगवंता. ३

हरिश्चंद्र तव सुत सत्याग्रहि,

सदा अहिंसारत तो निग्रहि,

अजस्त्र मारा रिपुचा साही,

परि हरीस आणी मानवता. ४

ह्या बाळांचा आत्मा पसरे,

युगांतरीं तो आतां उतरे,

एकवटुनि 'मोहिनीं' अवतरे,

तुं वांझ न गे माझी माता ! ५

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - मालकंस

ठिकाण - अजमेर

दिनांक - १३ एप्रिल १९२२

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP