मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
दुजेपणा मिठी आपणचि उठी । ...

संत निवृत्तीनाथांचे अभंग - दुजेपणा मिठी आपणचि उठी । ...

संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita

दुजेपणा मिठी आपणचि उठी । कल्पना हे सृष्टि गाळूं पाहे ॥ १ ॥

तें कृष्णरूप गाढे यशोदा घे पुढें । दूध लाडेंकोडें मागतसे ॥ २ ॥

सृष्टीचा उपवडु ब्रह्मांडाचा घडु । ब्रह्मींच उपवडू उघडा दिसे ॥ ३ ॥

निवृत्ति उघड ब्रह्मांडामाजि लोळे । नंदाघरीं खेळे गोपवेष ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP