मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
नकटी - अभावाचे नाक लावुनिया शोभे...

भारुड - नकटी - अभावाचे नाक लावुनिया शोभे...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


अभावाचे नाक लावुनिया शोभे ।

वरदळ भक्‍ती तैशावरी शोभे ॥ १ ॥

नकटीचा गुण उपहास लोकां ।

दांभिक भक्‍ती तैशी तुम्ही देखा ॥ २ ॥

काजळ कुंकू माथा वेणी ।

नकटी सुंदर म्हणेल कोणी ॥ ३ ॥

नकटीचा संग करी तोचि साजे ।

दांभिक भजनाते देवचि लाजे ॥ ४ ॥

एका जनार्दनी भावेविण ।

कुसराचे भजन ते नकटेपण ॥ ५ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP