रामचंद्राचीं आरती - साफल्य निजवल्या कौसल्या म...

रामचंद्राचीं आरती

रामचंद्राचीं आरती

साफल्य निजवल्या कौसल्या माता ।
जनक सुकन्याऽनन्या मुनिमान्या साती ॥
खेचर वनचर फणिवर भरत निजभ्राता ।
धन्य तो नृपनायक दशरथ पीता ॥ १ ॥
जय देव जय देव जय रविकुळटिळका ।
आरती ओंवाळूं त्रिभुवननायका ॥ धृ. ॥
आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ ।
रकिकुळमंडण खंडण संसारामूळ ॥
सुरवर मुनिवर किन्नर ध्याती पै सकळ ।
धन्य तो निजदास भक्त प्रेमळ ॥ जय. ॥ २ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000