मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

सांवतामाळीचरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२३९॥
नामदेवाप्रती झाला अभिमान । भक्तांमाजी जाण मीच थोर ॥१॥
भक्तांचें अंतर जाणे नारायण । बोलिला वचन नामयासी ॥२॥
तये वेळे देव तेथुनी चालिले । पाउल उमटलें कुंकुमाचें ॥३॥
तेथें निज भक्त होता सांवतामाळी । गेल तया जवळी पांडुरंग ॥४॥
देव ह्मणे सांवत्या लपवी मजला । चोर मागें आला लागवेगें ॥५॥
सावंता ह्मणे देवा लपा या उंसांत । थोर बळीवंत माग काढी ॥६॥
चिरोनियां पोट सांठविला विठा । येईल चोरटा ह्मणोनियां ॥७॥
माग जो काढीत नामा चालियेला । अरण्यभेटी गेला पांडुरंग ॥८॥
देवाजीचा माग येथवरी आला । येथें गुप्त झाला काय करुं ॥९॥
मग नामदेव रडूं जो लागला । सांवता धांवत आला तया जवळी ॥१०॥
सांवता ह्मणे नामा काय रडतोसी । काय दु:ख तुसी सांग बापा ॥११॥
देवाजीचा माग येथवरी आला । येथें गुप्त झाला काय करुं ॥१२॥
तयाविण माझा जाऊं पाहे प्राण । हांसे आनंदानें सांवतामाळी ॥१३॥
सांवत्याचे चरण धरिले बळकटें । आतां करी भेट त्याची माझी ॥१४॥
सांवत्याचे नाभीसी झळके पीतांबर । ओळखिला सत्वर नामयानें ॥१५॥
फोडुनियां पोट काढिला बाहेर । झाला जयजयकार तुका ह्मणे ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP