मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| चोखामेळ्याचें चरित्र दुसरें चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० चोखामेळ्याचें चरित्र दुसरें तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगचरित्रतुक्राराममराठीसंत चोखामेळ्याचें चरित्र दुसरें Translation - भाषांतर ॥८२१३॥चोख्यामेळीयानें पाजियेलें दहीं । पडूं दिलें नाहीं उणें त्यासी ॥१॥साधन द्वादशी आली एके वेळीं । उठोनि प्रात:काळीं काय बोले ॥१॥उठी ये ये कांते स्वयंपाक करी । आतां येईल हरी पारण्यासी ॥३॥तंव एका ब्राह्मणें ऐकियेली मात । तेणें दिवाणांत श्रुत केलें ॥४॥दिवाणांनी दूत पाठविले तेथें । ह्मणति त्या चोख्यातें धरुनी आणा ॥५॥येवोनियां दूर कर आसडीला । ह्मणे चोखामेळा काय झालें ॥६॥सभेचे पुसती रडतो हा कांरे । तो ह्मणे विचार ऐका माझा ॥७॥विठोबासी दहीं भात जेववितां । येणें माझ्या हाता आंसडीलें ॥८॥ह्मणती या महारानें देव बाटविला । जिवें मारा याला बैल जुंपा ॥९॥बांधोनियां पाय हांकिती बईल । धरोनि शेऊळ विठू उभा ॥१०॥तयाचि ये कांता उभी राहोनियां । ह्मणे देवराया हात काढी ॥११॥खादिलें जेवीले त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारुं पाहासी ॥१२॥सभेचे पुसती बोलति कवणासी । ती ह्मणे तुह्मांसी नकळे कांहीं ॥१३॥अनंत ब्रह्मांडें जयाचे उदरीं । तेणे चहूं करीं धरियेलें ॥१४॥सकळांसी तिनें केलें दरुशन । झालें समाधान चोखियाचें ॥१५॥तुका ह्मणे देव भक्तांचा कोंवसा । पावतो भरंवसा निश्चयेंसी ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : July 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP