मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

मयुरध्वज चरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८१८६॥
निमित्य करुनी पांडवांचा याग । स्वयें तूं श्रीरंग साह्य होसी ॥१॥
होय वेषधारी सांगातें अर्जुन । भक्तांचें मंडण करावया ॥२॥
दानाचिया मिषें पाहों आला भक्ता । दावावया पार्था सत्व त्याचें ॥३॥
जगदानी मागे कापोनियां शीर । परउपकार घडे येणें ॥४॥
पुत्र पत्नीहातें कापवावें शीर । आनंदें निर्भर गीत गावें ॥५॥
अर्ध कापोनियां देई हा दानासी । हरुष मानसी सर्वा मनीं ॥६॥
तुका ह्मणे कांहीं नये चित्ता भाव । तयाचीच देव अंगिकारी ॥७॥

॥८१८७॥
होई आतां माझ्या भोगाचा भोगीता । सकळ अनंता शुभाशुभ ॥१॥
आठउनी पाय राहिलों हृदयीं । निवारिली तयीं सर्व चिंता ॥२॥
अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धाचें ॥३॥
तुका ह्मणे झालें एकचि वचन । केलिया कीर्तन अराणूक ॥४॥

॥८१८८॥
बोलाउनी पत्नीपुत्र ह्मणे राजा । देहदान द्विजा देणें लागें ॥१॥
करुनियां स्नान नित्य नेम जाण । कर्म देवार्चन यथाविधी ॥२॥
रोवियला स्तंभ आंवळीला देह । आणविलें पाहे शस्त्र तेव्हां ॥३॥
कर्वती मस्तक हर्षे गीत गाती । द्वारकेच्या पती मायबापा ॥४॥
न मानिती खेद जयजयकार केला । वामनेत्रा आला जळबिंदू ॥५॥
उठा ह्मणे चला रडतिया दान । घेता आहे कोण दु:खिताचें ॥६॥
राजा ह्मणे स्वामी सव्य दान दिधलें । अधोगती गेलें वामभाग ॥७॥
आपुलिया स्वार्था देह खेद करी । माझिया अंतरीं नाहीं तैसें ॥८॥
आत्मा अविनाश आधार नामाचा । आह्मां वैष्णवांचा निर्धार हा ॥९॥
तुका ह्मणे तुह्मी न व्हावें उदास । उदार सर्वास असों आह्मी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP