आज्ञापत्र - पत्र ६०

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


आरमाराची छावणी करणें तो दर्या तुफाण होणार तों आठ-पंधरा दिवस अगोधर करावी. तेहि प्रतिवर्षी येकाच बंदरी अथवा हरयेक जंजिरियाखाली किंवा उखड्यामानीं सर्वथा न करावी. प्रतिवर्षी यक्याच बंदरी छावणी केल्याने आरमाराचे लोक बारगळ, ताकीद केली तरी कांही येक मुलकास उपद्रव होतच आहे तो येकाच मुलकास होणार. यैसें होऊं न द्यावे. उघड्यामानीं आरमाराची छावणी केली तरी छावणी करणे ते आरमार धड्यावर वोढावें लागतें. वरती छावणी, करावी तरी आरमाराचे मनुष्य बहुवस, प्रायशा अविंध आणि उन्मत्त. येखादे बोलीचालीमुळे कच-कळागत होऊन लोक वाया जाणार, हे बरें नव्हे. याकरिता आरमाराची छावणी करणें ते प्रतिवर्षी नूतन बंदरी, ज्याबंदरी मोहारी किला. किल्याचे दहशतीनें गनीम खाडी उतरो न शके. अथवा आड-खाडी. यैसे खाडींत आरमाराची छावणी करावी. तेहि सारें आरमार येकाच जागें न ठेवावे, जागा जागां छावणीस ठेवावें. रात्रीस खाडीतील गस्त व खुष्कीची गस्त आरमाराभोवतीं करीत जावी. सुबेदारांनी आपला कबीलादेखील दोन महिने त्याच जागी ठेऊन, आरमाराची चाकरी करुन, लागेल सामान तेविषयीं हुजूर लेहून विल्हे करुन घ्यावी. मुलकांत सर्वथा होऊं न द्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP