आज्ञापत्र - पत्र ५६

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


आरमार आणि त्याचा सरंजाम

आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तदवतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्यमेव करावें. चालीच्या गुराबा बहुत थोर ना बभुत लहान यैशा मध्यम रीतीनें सजाव्या. तैसीच गलबतें करावीं. थोर बरसें, फरगात जे वार्‍याविणें प्रयोजनाचे नव्हेत यैसें करावयाचें प्रयोजनच नाहीं. कदाचित येक-दोन सलाबतीमुळें केले तरी जें आरमार करावें तावरी मर्दाने मारक माणूस, भांडी, जंबुरे, बंदुखा, दारुगोळी, होके आदिकरुन आरमारी प्रयोजन-समान यथेष्ट बरें सजुतें करावें. त्याचे प्रत्यक सुभे करावे. दर सुभेयास पांच गुराबा, पंधरा गलबतें करुन द्यावीं, इतक्यांस येक सरसुभा करावा, त्याचे आज्ञेत सर्वांनी वर्तावें.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP