निरंजन माधव - वशिष्टसुशर्मासंवाद

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


श्रीमत्‍ ब्रह्मगिरीमहात्मकथनी नंदीश्वरा षण्मुखें ।
ऐशी हे कथिली कथा परिसिली होती शिवाचे मुखें ।
ते नंदी वदला रहस्य बरवें श्वेतामुनीकारणें ।
जे हे पद्मपुराणसंमत घडे श्रोतेजना पारणें ॥१॥
सुशर्मा या नामें द्विज सधन संसार करितां ।
न मानी आशंका अधमजनदारास फिरतां ।
न दे पैसा केव्हां स्वगृहिं अथवा ब्राह्मणकरीं ।
सुतीथी सत्क्षेत्रीं कृपण कणही खर्च न करी ॥२॥
तयाच्या प्रारब्धें अवचट कसा योग घडला ।
वशिष्टाच्या बोधें निजसुकृत ठेवा उघडिला ।
किडा कोरी काष्ठें तव सहज सद्वर्ण पडला ।
तसा या संसारीं तरुनि सुखसेजे पहुडला ॥३॥
मू.- वशिष्ट उवाच । भवान्हि भाग्यवान्लोके संसारो विहितस्त्वया ।
इदानीं सकलं हित्वा काशीं याहि द्विजोत्तम ॥१॥
टी० - बोले वशिष्ट् जगिं तूंचि सभाग्य होसी ।
कांता सुपुत्र धन बांधव दासदासी ।
संसार सुंदर करोनि निबद्ध गेहीं ।
सारें त्यजोनि द्विज, काशिस आजि जायी ॥४॥
मू. - अद्य वाब्दशतांते वा मृत्यु: पुंसां हि निश्चित: ॥
तस्मात्प्राज्ञेन कर्तव्यं किमपि स्वस्य कारणम्‍ ॥२॥
टी० - हो आजिं आणिक शतां वरुषांतरींहीं,
प्राण्यासि तो अढळ मृत्यु विचार नाहीं ।
जाणोनि निश्चित असें हित आचरावें
त्याला जगीं चतुर थोर असें म्हणावें ॥५॥
मू.॥ ऋणानुबंधिन: सर्वें पशुपत्नीसुतादय: ।
ऋणक्षये क्षयं यांति तत्र का परिदेवना ॥३॥
टी० - पूर्वानुबंध विवशें पशुपुत्रदारा ।
संबंध पांथिक जनांपरि हा पसारा
होतां ऋणक्षय तदा न वसेति कोणी
यालागि शोक त्यजिजे परि जाणत्यानी ॥६॥
मू. ॥ इच्छा विहारशयनासनभोजनेषु ।
बाल्यं गतं तव सखे जननीभयस्य ।
माभूच्छुभाशुभविचारपर: कदाचित्‍ ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥४॥
टी० - झाली बाळपणीं विहार शयनीं जे भोजनीं आवडी ।
ते गेलीच वृथा भयें जननिच्या दंडाचिये सांकडीं ।
नाहीं युक्त तुला विचार सुचला जेणें भवा नाशिजे
आतां जाउनि काशिके प्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥७॥
मू. ॥ यत्कामिनीकुचयुगं विनिमेष वीक्ष्य
हृष्ट: पुन: पुनरभॄतकिमुतत्र लब्धं ।
इष्टोहमस्मि भवतो वद सत्यमेव ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥५॥
टी० -जे कांताकुचकुंभ हृष्टमनसें तां फारदां लक्षिली
तेथें प्राप्त पदार्थ काय घडला हे मात सांगे भली ।
मीं तूझा अतिमित्र यास्तव तुतें सत्यार्थ हा पूसिजे
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥८॥
मू. ॥ मूत्रप्रवर्षिणि गुदस्य समीपसंस्थे ।
भिन्ने द्विधा च युवतीजनचर्मखंडे ।
प्राप्तं क्षयं निजमनोधनजीवितं च
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥६॥
टी० - वाहे मूत्र गुदासमीप वसत्या दुर्गंध कुंदाप्रती ।
द्वेधा जें चिरलें अशा युवतिच्या चर्मासि तां दुर्मती ।
भाळोनी लुटिलें मनासह धना आयुष्य दुर्मीळ जें
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥९॥
मू.॥ वृद्धोदुनासि पतितोसि सहस्त्रचिंता - ।
युक्तोसि पुत्रधनवेष्ममयोसि मूढ ।
अद्यापि वांछसि धनं किमु ते धनेन
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथं ॥७॥
टी० - आतां वृद्ध दशा तुला प्रकटली जे कोटिचिंतामयी ।
सामर्थ्या पडलें उणें मन धनीं पुत्रादिकीं आलयी ।
इच्छा वाढविसी किती धन तुझ्या कार्यास येनाच जें
आतां जाउनि काशिकेसि सखया श्रीविश्वनाथा भजे ॥१०॥
मू. ॥ चक्षुर्गभिष्यति भविष्यसि दंतहीन: ।
स्वस्थ: पतिष्यसि सुतस्य गृहस्थ कोणे ।
त्वां धिक्करिष्यति सुतो वनिता स्नुषा च
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥८॥
टी० - डोळे जातिल दंतहीन स्वस्छ उदियां कोणांत पुत्रालयीं ।
धिक्कारें वदतील पुत्र वनिता कन्या स्नुषा निंद्य जें ।
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥११॥
मू. ॥ थूत्कारमत्र कुरुषे च कुरुष्व शय्यां ।
कर्णे मुखादिति सुतस्य वचो निशम्य ।
अत्यंतमेष्यसि रुषं कुरु मा विलंबम्‍
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥९॥
टी० - येथें थुंकसि खांकरे, निज उगा, येते जना चीळसी ।
ऐसें ऐकुनि पुत्रभाषण मनीं संताप तूं पावसी ।
कांहीं तूं न करीं विलंब सहसां मद्‍वाक्य घे सार जें ।
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥१२॥
मू. ॥ क्लेशैस्त्वया बहुविधं समुपार्जितं यत्‍ ।
तत्सर्वमेव सुतहस्तगतं धनं स्यात्‍ ॥
त्वं चोरवत्‍ खलु भविष्यसि तच्च मूढ
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥१०॥
टी० - मूढा जें धन अर्जिले बहुविध क्लेशें तुवा आपुलें ।
त्याचा होइल नाथ पुत्र उदियां कांही तुझें ना चले ।
ओराचेपरि भाससील धन तूं खर्चास जासील जें ।
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥१३॥
मू. ॥ निष्काशयामि तव मूत्रपुरीषमेतत्‍ ।
मृत्युर्नतेस्ति मम चापि सुदुर्भगाया: ॥
श्व: श्रोष्यसीति वचनं निजवल्लभाया: ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥११॥
टी० - मी तूझ्या प्रतिवासरीं निपटितें दुर्गंधमूत्रा मळा ।
येना कां तुज शीघ्र मृत्यु अथवा रांडकीला मला ।
ऐसेही निजवल्लभावदनिंए तूं ऐकसी बोल जे ।
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥१४॥
मू.॥ किं चिंत्यसे ह्यनुदिनं धनमेव मूढ ।
यत्वां न मोक्षति पुरा यमदूतबंधम्‍ ।
धर्मं विचिंतय स मोक्षति मृत्युपाशात्‍ ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥१२॥
टी० -अद्यापी प्रतिवासरीं धन असें मूढा मनीं चिंतिसी ।
सोडाया असमर्थ जैं यमगणीं त्या बांधिजे तामसीं ।
मृत्यूचा दृढ पाश तोडिल अशा धर्मासि तां चिंतिजे ।
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥१५॥
मू. ॥ सुप्तो भुजंग इव जाग्रति पर्णपातात्‍ ।
तद्‍वद्धनेति वचनश्रवणाद्धि मूढ ।
किं धावसि प्रतिदिनं क्क धनं ब्रुवाणो ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥१३॥
टी० - निद्रा सर्प करी बहूत परि तो जागे दळाच्या चळे ।
तैशी नीज तूला स्वकर्मविषयी वित्तार्थ जासी पळें ।
तोंडेंही प्रतिवासरीं बरळसी तें वित्त नि:स्सार जें ।
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या विश्वनाथा भजे ॥१६॥
मू. ॥ गात्रं कृशत्वमुपयाति दिने दिने ते ।
तृष्णा कथं न भवत: कृशतां प्रयाति ॥
पुष्टा भवत्यनुदिनं विपरीमेतत्‍ ।
वाराणसीं व्रज सखे भज निश्वनाथम्‍ ॥१४॥
टी० -आंगी ते कृशता दिसंदिस घडे तृष्णाच वाढे कशी ।
ते कां क्षीण नव्हे बळेंचि विषयीं बांधोनि पाडी फशी ॥
पुष्टा होतचि जातसें अनुदिनी आशा महद्भुत जे ।
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥१७॥
मू. ॥ त्वं किं विलोकयसि रे दुस्तरसिंधुमध्ये ।
मृत्युं विलोक्य विषवद्विषयान्विमुच्य ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥१५॥
टी० - तूं हें पाहसि भोंवतें विषय कां अद्यापि इच्छावशें ।
जेहीं बूडविलें भवाब्धिसलिली हें नेणसी तूं कसें ।
टाकावेचि विषापरीं विषय हे प्राणक्षया मूळ जे ।
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥१८॥
मू. ॥ रे मूढ ललयसि किं विषयान्पुनस्त्वम्‍ ।
ये भ्रामयंति भवकोटिवने भवंतम्‍ ।
शक्तो न मोक्तुमिति चेतसि मन्यमानो ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥१६॥
टी० - मूढा तूं विषयासि लाड कवण्या कार्यार्थ देसी पुन्हां ।
जेहीं या भवकाननीं फिरविलें हें नेणसी आपणां ।
टाकों मी न सके ह्मणोनि उगलें कैसेंनि तां मानिजे
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्री विश्वनाथा भजे ॥१९॥
मू. ॥ याम्या भटा विकटवक्त्रविशालनेत्रा
बध्वा भवंतमनिशं बहु तर्जयंत: ।
नेष्यंति दुर्गनरके पथि यातनार्थम्‍ ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥१७॥
टी० -मोठे ते यमदूत वक्रवदनें डोळे विषाळें बळें
तूंतें बांधुनि भेडसावितिल ते दुर्वाक्य नानाछळें ।
नेती निश्चय यातनार्थ नरकद्वारासि वोढोनि जे
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्री विश्वनाथा भजे ॥२०॥
मू. ॥ त्वं सर्वसंगरहित: सममेव पश्यन्‍ ।
कौपीनमात्रवसन: करपात्रभोजी ।
आनंदभोधमजरामरमात्मरुपं ।
वाराणसीं व्रज सखे भज विश्वनाथम्‍ ॥१८॥
टी० - टाकी हा अभिमान संग समुदा भिक्षा करीं स्वीकरी
पाहें सर्व समान ईश्वर जनीं कौपीन कंथा धरीं ।
सच्चिन्मात्र जरादिशून्य परमानंद प्रभू चिंतिजे
आतां जाउनि काशिकेप्रति सख्या श्रीविश्वनाथा भजे ॥२१॥
मू.॥ अष्टादशस्मृतिपुराणसमुच्चयानाम्‍ ।
तत्वं विलोक्य कथितं कलिकल्मषघ्नम्‍ ।
संसारसागरनिमग्नवराय तुभ्यं
तर्तुं गृहाण मनसा कुरु मा विलंबम्‍ ॥१९॥
टी० - आतां तूं न करी विलंब सहसा स्मृत्यर्थ शोधोनियां ।
हा तत्वार्थ विचारसार कथिला जो निश्चयें घ्यावया ।
जेणें या कलिकल्मषा जिणुनियां दु:खार्णवा लंघिजे ।
ऐसें हें तुज बोधजाहज दिलें तें तां मनें घेयिजे ॥२२॥
मू. ॥ इति शीक्षापितस्तेन वशिष्ठेन महात्मना ।
प्रहस्य प्रथमं किंचित्‍ शुशर्मा प्रत्युवाच तं ॥२०॥
टी० - साक्षात्तपोधन वशिष्ठमुनी द्विजाते ।
वैराग्यबोध कथिला तरणार्थ त्यातें ।
हांसोनि मंद वदला मुनितें सुशर्मा ।
मी पावलों तव कृपेस्तव स्वात्मधर्मा ॥२३॥
मू. ॥ धन्योस्म्यनुगृहीतोस्मि सफलं जीवितं मम ।
येन त्वयाद्य संसारसागरान्मोचितोस्म्यहम्‍ ॥२१॥
टी० - केला अनुग्रह म्हणोनि सुधन्य झालों ।
बोधें तुझ्या मुनिवरा बरवा बुझालों ।
झालें मदीय तरि जीवित धन्य आतां ।
संसारसिंधु तरलों मुनिवंशनाथा ॥२४॥
मू. ॥ इत्युत्क्वा विररामाथ मुनिमानम्य भक्तित: ।
पूजयामास रत्नाद्यैरर्ध्यपाद्यपुर:सरम्‍ ॥२२॥
टी० - ऐसें वदोनि धरि सच्चरणारविंदा ।
वाहोनि मौन मनिं पावत फार मोदा ।
भक्तीं करी परम पूजन सद्विधीसीं ।
अर्पोनियां सुवसनें धनरत्नराशी ॥२५॥
मू. ॥ ततो जगाम मुनिराट्‍ स्वाश्रमं शिष्यसंयुत: ।
सुशर्मा तु तदा ज्ञात्वा मिथ्याभूतं चराचरम्‍ ॥२३॥  
टी० - तेव्हां सशिष्य मुनि जाय निजाश्रमातें ।
याच्या हरोनि भवतापमहाश्रमातें ।
मिथ्या समस्तहिं चराचर हें सुशर्मा ।
जाणोनि टाकित अहंममता सुवर्मा ॥२६॥
मू. ॥ अहंतां त्यक्त्वा देहगेहादिकेष्वपि ।
ततो जगाम त्वरित: काशिकां चित्प्रकाशिकाम्‍ ॥२४॥
टी० - हें देह गेह अपुलें न म्हणे कदापि ।
राहे सरोरुह सरोवरिं ते अलेपीं ।
गेला त्वरें त्यजुनि सर्वहि काशिकेला ।
देखे दिवीं परमतत्वप्रकाशिकेला ॥२७॥
मू. ॥ स्नात्वा तुं मणिकर्णिक्यां दृष्ट्‍वा देवं महेश्वरं ।
निवासं कृतवांस्तत्र देवमारायधन्नपि ॥२५॥
टी०- नाहोनिया शुभजळीं मणिकर्णिकेच्या
विश्वेश तो निरखिला जनिता जगाचा ।
केला निवास मग त्या नगरींत तेणें
अर्ची अहर्निश महेश्वर भक्तिमानें ॥२८॥
मू. - स्थापयित्वा च लिंगानि शतशोथ सहस्त्रश: ॥
दत्तवांश्च धनं तत्र द्विजेभ्यो बुधसत्तम: ॥२६॥
टी० - लिंगें प्रतिष्ठुनि सहस्त्रशतें सुभावें ।
दे गोधनें धन अनेक उदारभावें ॥
जे शीलवंत श्रुतवंत कुटुंबवंत ।
दारिद्य्रयुक्त वर भूसुर त्या अनंत ॥२९॥
मू. - ततोऽचिरेण कालेन वेदांतश्रवणेन च
विश्वं शिवात्मकं पश्यञ्‍जीवन्मुक्तो बभूव ह ॥२७॥
टी० - लाहोनि सज्जनसमागम नित्यकाळीं ।
वेदांतशास्त्र विवरी निवसे निराळीं ।
देखोनि विश्व समुदें शिवरुप डोळां ।
जीवंत मुक्तिपदवी घडली जयाला ॥३०॥
मू. - एवं कालेन बहुना देवमाराध्य भक्तित: ॥
त्यक्त्वा कलेवरं तत्र गंगायां भक्तिसंयुत: ॥
जगाम शिवसारुप्यं योगिनामपि दुर्लभं ॥२८॥
टी० - ऐशी तयासि वरुषें क्रमलीं अनेगें ।
आराधिला शिवसनातन भक्तियोगें ॥
टाकी कलेवर घडे शिवरुप जेथें
पावोनि त्या अवसरीं मणिकर्णिकेतें ॥३१॥
ऐसें महंतपद पाउनि मुक्तिधामीं ।
जो शोभला शिवगणाग्रणि पूर्णकामीं ॥
याकारणें विनवितो कविराज लोकां ।
वैराग्यबोध बरवा सुमनें विलोकां ॥३२॥
ऐसें कथानक सुरम्य कुमारनंदी- ।
संवाद त्र्यंबकमहात्मकथाप्रबंधीं ॥
आहे म्हणोनि कथि सूत सुतोषचित्तें ।
सप्रेम नैमिषवनीं मुनि शौनकातें ॥३३॥
समश्लोकी ऐशी कविवर वदे सुंदरगिरा ।
कृपा हे संतांची म्हणुनि सुखदा होय चतुरां ॥
सदा सद्वैराग्यें मन गुरुकृपें पूर्ण विलसे ।
मिळे ब्रह्मानंदीं म्हणउनि बनाजी वदतसे ॥३४॥
इतिश्रीमत्सकंदपुराणे ब्रह्मगिरिमहात्मे स्कंदनंदिकेश्वरसंवादे
सुशर्मोपदेशोनाम अध्याय: । टीका निरंजनमाधवयोगीविरचिता समाप्ता ॥
श्रीसद्‍गुरुचरणारविंदार्पणमस्तु । विरोधिसंवत्सर ( शके १६९१)
वैशाख कृष्णाष्टमी भानुवासरे लेखनं समाप्तम्‍ ।
श्रीशिवकेशवयोश्चचरणारविंदार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP