मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
अनुमान

अर्थालंकार - अनुमान

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
नभाला ज्या अर्थी चलजलदधूमें भरियलें ॥
किटालांचीं रुपें धरिति जणु खद्योत दिसले ॥
विजांच्या ज्वालांनी दिसतिहि दिशा-पिंगट मला ॥
गमे त्या अर्थी हा मदनवणवा पांथतरुला ॥१॥

येथें श्लोकाचे तीन चरणावरुन चवथ्या चरणांत सांगितलेलें अनुमान बांधिले आहे. याप्रमाणेंच खालीं ही: -

श्लोक-
जेथें भंगसमानलोलनयना ह्या भ्रूधनु लाविती ॥
येथेंची पडतीं जरी शरशतें मर्मास जीं वेधितीं ॥
त्या अर्थी धनु वांकवून अपुलें क्रोधें शरा ओढुनी ॥
हा धांवे रतिकांत सत्य दिसतो त्यांचे पुढें होउनी ॥२॥

गद्य-
पूर्वीचे रुपकसंकीर्ण व दुसरे अतिश्योक्तिसंकीर्ण अनुमान आहे.

आर्या-
दिसतात न विहगकुलें मिटताती पंकजें जरी सत्य ॥
हो मालती प्रफल्लित वाटे अस्तास जाय आदित्य ॥३॥

श्लोक-
सौमित्रे ! प्रिय बैस बा तरुतळीं चंडांशु हा तापद ॥
रात्रीचा रवि कायसा रघुपते ! हा चंद्र कांतिप्रद ॥
वत्सा ! हें तुजला कसें समजलें ! घेई कुरंगा न कीं ॥
हा कोठें असतो ? कुरंगनयने ! चंद्रानने जानकी ॥४॥

गद्य-
हें शुद्धानुमान झालें.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP