आर्या-
पद्मादिक नानाविध बंधीं जरि वर्ण योजना दिसते ॥
चित्र असें ठेविति तरि बुधजन अभिधान त्या अलंकृतितें ॥१॥

श्लोक.
अनुष्टुपछंद.
हाय कामचि हा गेला । लागे हाता न गेय हा ॥
हायगे न जहाला कां । काला हारार्थ हा ॥२॥

गद्य -
जेव्हां वर्णांची रचना पद्मासारख्या अथवा छत्रासारख्या अथवा खड्‍गासारख्या इत्यादि नानाप्रकारच्या आकृतींत केलेली असते तेव्हां हा अलंकार होतो.
श्लोक (२)
ची रचना पद्मबंधांत केलेली आहे. ती खालील आकृतीवरुन समजेल.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP